Jammu Kashmir: कठुआ मधील पूजा ठरली पहिलीच महिला बस चालक, सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव
Jammu Kashmir: पाच वर्षांपूर्वी आपल्याला आवड म्हणून ड्रायव्हिंग शिकलेली पूजा हिने आपण एखादी मोठी गाडी चालवू असे स्वप्न पाहिले होते. तर पूजा हिचे हे स्वप्न आता सत्यात साकार झाले आहे. पूजा ही बसोहली सांदर गावची रहिवासी असून पूजा ही कठुआ मधील पहिलीच महिला बस चालक ठरली आहे. तर पूजाचे हे स्वप्न आणि तिची जिद्द पाहून सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. पूजा ही आता व्यवसायिक रुपात बस चालवायला लागली आहे.
बुधवारी सकाळी जम्मू येथून कठुआ आणि कठुआ ते जम्मू या मार्गावर धावणाऱ्या बसचे स्टियरिंग पूजा हिच्या हातात दिसून आले. त्यामुळे प्रत्येकजण हैराणच झाले आहेत.तर पुजा हिच्या चेहऱ्यावर मात्र आनंद दिसून आला. परिवार आणि आजूबाजूच्या लोकांनी पूजा हिला ड्रायव्हिंग करण्यापासून रोखत होते. मात्र आता सर्वांकडून तिचे कौतुक केले जात आहे. पूजा हिने अन्य चार महिलांना सुद्धा ड्रायव्हिंग शिकवण्याचे ठरवले आहे. याआधी पूजा हिने काही महिने जम्मू-कठुआ दरम्यान ट्रक ही चालवला आहे. (Jallikattu: जल्लीकट्टू खेळाचे आयोजन करण्यास तामिळनाडू सरकारची परवानगी; कोरोना विषाणू नियमांचे करावे लागेल पालन)
जम्मू-कठुआ बस युनियन चे प्रमुख रछपाल सिंह यांनी असे म्हटले की, दोन दिवसांपूर्वी पूजा त्यांच्याकडे आली होती. त्यावेळी तिने बस चालवण्याची इच्छा व्यक्त केली होती. कारण तिने याआधी सुद्धा ट्रक चालवला होता. तसेच पूजाकडे अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनाचा परवाना ही आहे. त्यामुळे तिला बस चालवण्यासाठी कोणतीच समस्या नव्हती. सकाळी 11 वाजून 52 मिनिटांनी पूजा बस घेऊन जम्मू येथून कठुआ पोहचली आणि संध्याकाळी सुद्धा वेळेवर परतली.
बस चालवण्याचे पूजाचे स्वप्न पूर्ण झाल्याने खुप आनंदित असून ती स्वत:ला भाग्यवान समजत आहे. तिचे असे म्हणणे आहे की, लहानपणी पाहिलेले स्वप्न आता पूर्ण झाले आहे. यासाठी काही समस्यांना ही सामोरे जावे लागले. नवरा आणि परिवाराच्या विरोधात जाऊन हे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले होते. पूजाने पुढे असे ही म्हटले की, गाडी चालवण्याचे तिने आधीपासून मन बनवले होते. पण परिवारासमोर ही व्यक्त केली मात्र त्यांनी यासाठी विरोध दर्शवला. त्यांनी असे म्हटले की, घरातील मुलीने बाहेर जाऊन अशा पद्धतीची गाडी चालवू नये. परंतु महिलांच्या पायात बेड्या घातल्या आहेत त्या आता तोडण्यास सुरुवात केली असून अन्य महिलांनी सुद्धा आपली स्वप्न पूर्ण करावीत.