जम्मू-कश्मीर येथे पुलवामाची पुनारावृत्ती टळली, हल्ला होण्यापूर्वीच गाडीत लावलेले IED स्फोटक केले निकामी
कारण पुलवामा येथे एका सँट्रो गाडीत IED स्फोटक असलेली गाडी सापडली असून त्याची जवानांनी वेळीच दखल घेतली.
जम्मू कश्मीर येथे गुरुवारी पुलवामा सारखा होणारा हल्ला जवानांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. कारण पुलवामा येथे एका सँट्रो गाडीत IED स्फोटक असलेली गाडी सापडली असून त्याची जवानांनी वेळीच दखल घेतली. गाडीतील स्फोटक जवानांनी वेळीच निकामी केल्याची माहिती समोर येत आहे. पुलवामा पोलीस, सीआरपीएफ आणि आर्मी यांनी एकत्रितपणे यासंबंधित प्रकरणावर पावले उचलत गाडीचा तपास केला. त्यामध्ये IED स्फोटक असल्याचे समोर आले. त्याचवेळी बॉम्ब डिस्पोडल स्क्वायड यांना बोलवण्यात आले होते.
असे सांगण्यात येत आहे की, एक गाडी दहशतावाद्याकडून चालवण्यात येत होती. जो सुरुवातीला गोळीबार करण्यात आल्यानंतर पळाला होता. हे प्रकरण आता NIA यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. ही गाडी पुलवामा मधील रजपुरा रोड जवळील शादीपुरा येथे पकडण्यात आली आहे. गाडीवरील क्रमांक हा कुठआ येथील रजिस्ट्रर केलेला होता. जम्मू-कश्मीर पोलिसांनी या गाडीला ट्रॅक केल्यानंतर त्यात बॉम्ब लावल्याचे समोर आले. बॉम्ब डिस्पोजल युनिट यांना बोलावण्यात आल्यानंतर आजूबाजूचा परिसर खाली करण्यात आला होता.(Forest Fire in Uttarakhand: उत्तराखंडमधील जंगलात लागलेल्या आगीमुळे 71 हेक्टर जमीन उध्वस्त; अनेक वन्यजीव प्रजाती धोक्यात)
यापूर्वी हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानातून प्रशिक्षित एक कबूतर जम्मू कश्मीर मधील कठुआ जिल्ह्यातील आंतराराष्ट्रीय सीमेवर पकडण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी सोमवारी म्हटले होते की, कबुतरासह एक कोड पाठवण्यात आला होता. त्यानंत र हीराननगर सेक्टर मधील मनयारी गावातील काही लोकांनी या कबुतराला पकडले होते.