Chandrayaan-2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश, वैज्ञानिकांसाठी महत्वाचा दिवस
चंद्रयान 2 (Chandrayaan-2 ) ही भारताची महत्वाकांक्षी मोहिम आता यशाच्या वाटेवर सुरु झाली आहे. तर आज (20 ऑगस्ट) चांद्रयान 2 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. त्यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांसाठी आजचा दिवस फार महत्वाचा असणार आहे.
चंद्रयान 2 (Chandrayaan-2 ) ही भारताची महत्वाकांक्षी मोहिम आता यशाच्या वाटेवर सुरु झाली आहे. तर आज (20 ऑगस्ट) चांद्रयान 2 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. त्यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांसाठी आजचा दिवस फार महत्वाचा असणार आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी चांद्रयान 2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणार आहे. तर 7 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी चांद्रयान 2 च लॅंन्डिंग पाहण्यासाठी इस्रोमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी असे सांगितले की, चांद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना कठीण स्थिती निर्माण होईल. कारण चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती 6500 किमी पर्यंत असते. त्यामुळे चंद्रयान 2 ची गती करण्यात येणार आहे. नाहीतर चांद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्रयान 2 त्याचाकडे आकर्षिले जाऊन त्यांच्यामध्ये टक्कर होण्याची शक्यता आहे. गति कमी करण्यासाठी चांद्रयान 2 ची ऑनबोर्ड प्रोपल्शन सिस्टिम थोड्यावेळासाठी सुरु करण्यात केली जाईल. दरम्यान एक छोटी चुकसुद्धा यानाला अनियंत्रित करु शकते.(Chandrayaan 2 Mission: 13 भारतीय पेलोड आणि 'नासा'च्या एका उपकरणासह चंद्रयान 2 मिशन अवकाशात झेपावणार, ISRO ची माहिती)
ANI ट्वीट:
चांद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत पोहचल्यानंतर 31 ऑगस्ट पर्यंत चंद्रा भोवती गोलगोल फिरत राहणार आहे. त्यावेळी पुन्हा एकदा कक्षेत बदल केला जाईल. चांद्रयान 2 चंद्राच्या सर्वात जवळच्या कक्षेत पोहचण्यासाठी चार कक्षा बदलाव्या लागणार आहेत. तसेच चांद्रयान 2 लॅन्डर विक्रम आणि रोवर प्रज्ञान चंद्राच्या भुमीवर उतरुन प्रयोग करणार आहे. मात्र ऑर्बिटर वर्षभर चंद्राभोवती फेऱ्या घालत रिसर्च करणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)