International Women's Day 2020: जागतिक महिला दिनानिमित्त शक्ती पुरस्काराने सन्मानित महिलांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
जागतिक महिला दिनानिमित्ताचे औचित्य साधून राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह देशातील नेत्यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आम्ही नारी शक्तीच्या भावना आणि उपलब्धी यांना सलाम करतो. देशातील महिलांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी शक्ती पुरस्काराने सन्मानित केलेल्या महिलांशी संवाद साधला. या दरम्यान महिलांनी त्यांच्या यशाची कथा नरेंद्र मोदी यांच्यासमोर व्यक्त केली. तसेच आयुष्यात यशाच्या मार्गापर्यंत पोहचण्यासाठी कोणते चढउतार आले हे सुद्धा मोदी यांना महिलांनी सांगितले.नरेंद्र मोदी यांनी महिलांशी संवाद साधताना त्या कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात मेहनत करुन पुढे जात असल्याचे म्हटले आहे. तसेच शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या महिलांचे कौतुक सुद्धा मोदी यांच्याकडून करण्यात आले आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विविध क्षेत्रातील महिलांचा नारी शक्ती पुरस्कार 2020 ने सन्मानित केले आहे. त्यामध्ये 2018 मध्ये लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या दिनी जितरवाल, अवनी चतुर्वेदी आणि भावना कांत यांना पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.(International Women’s Day 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अमित शहा, राजनाथ सिंह, शरद पवार, अजित पवार, धनंजय मुंडे, नवाब मल्लिक आदी दिग्गज नेत्यांनी 'जागतिक महिला दिन 2020' निमित्त दिल्या खास शुभेच्छा!)
Tweet:
अशाप्रकारे महिलांप्रति अभिमान व्यक्त करत देशातील अनेक दिग्गजांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री-शक्तीला मनपूर्वक सलाम केला आहे. आज या दिवसाचं औचित्य साधून जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जगातील दिग्गज नेत्यांकडून आज महिलांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.