Indian Stock Market: FPO मागे घेताच अदानी समूहाच्या शेअर्सना जोरदार झटका; सेन्सेक्स, निफ्टीही घसरला
एफपीओ मागे घेताच अदानी समूहाच्या कंपन्यांना जोरदार झटका बसला. खास करुन, अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी , अदानी टोटल गॅस आदी कंपन्यांच्या समभागांना लोअर सर्कीट लागले. ही घसरण अदानी यांना कुठे घेऊन जाणार याबाबत जोरदार उत्सुकता आहे.
भारतीय शेअर बाजार (Share Market) आज दोलायमान स्थितीत पाहायला मिळत आहे. एक बाजूला हिंडनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) रिपोर्ट आणि त्याचा परिणाम म्हणून घसरत असलेल्या अदानी समूहाच्या समभागांच्या किमती. त्यातच अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी आज स्थगित केलेली फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (Adani FPO) आणि काल सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) या सर्वांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाला. केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय शेअर बाजार गडगडला. गुरुवारी (2 फेब्रुवारी 2023) सकाळी शेअर बाजाराची सुरुवातच (Share Market Open) नकारात्मक झाली.
एफपीओ मागे घेताच अदानी समूहाच्या कंपन्यांना जोरदार झटका बसला. खास करुन, अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी , अदानी टोटल गॅस आदी कंपन्यांच्या समभागांना लोअर सर्कीट लागले. ही घसरण अदानी यांना कुठे घेऊन जाणार याबाबत जोरदार उत्सुकता आहे. (हेही वाचा, Gautam Adani On Withdrawal Of FPO: सध्याच्या बाजाराच्या स्थितीत ते 'नैतिकदृष्ट्या योग्य' नाही - गौतम अदानी (Watch Video))
विश्लेषक सांगत आहेत की, भारतीय शेअर बाजार गडगडण्यास केवळ भारतातील घटनाच कारणीभूत नाहीत. सिंगापूर एक्चेंज वर निफ्टी फ्यूचर सकाळी 71 अंकांनी घसरला. बाजार सुरु होण्यापूर्वी भारतीय शेअर बाजारातही असाच संकेत मिळाला. बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) जवळपास 250 अंकांनी तर एनएसई निफ्टी (BSE Sensex) सुमारे 50 अंकांनी घसरला. नाही म्हणायला थोडासा वेळ गेल्याने बाजार सावरायला सुरुवात झाली. मात्र, बाजारात समभागांची घसरण आणि वधार संमिश्र स्वरुपाचाच राहताना दिसतो आहे.
भारतीय शेअर बाजारात सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 463.22 अंक म्हणजेच 0.78 % घसरणीसह 59,244.86 अंकांवर उघडला. तर निफ्टी 157.75 अंक म्हणजेच 0.90% घसरुन 17,458.55 अंकांवर उघडला. या आधी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी म्हणजेच कालही शेअर बाजार घसरला. अर्थसंकल्प संसदेत सादर होत असताना सकाळच्या सत्रात शेअर बाजारात जोरदार वधार पाहायला मिळाला. मात्र, दुपारनंतर बाजारातील तेजी काळोखीत बदलू लागली. काल बाजार बंद झाला तेव्हा सेंसेक्स 158.18 अंकांचया किरकोळ तेजीसह थ 59,708.08 अंकांवर आणि निफ्टी 39.95 अंकांच्या घसरणीसह 17,622.20 अंकांवर स्थिरावला.
सांगितले जात आहे की, स्थानिक शेअर बाजारावर अमेरिकेतील व्याज दर (US Interest Rate Hike) वाढला जाण्याचा मोठा दबाव आहे. अमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिजर्व बँकेच्या व्याज दरात पुन्हा 0.20% वाढ (Fed Rate Hike) झाली आहे. त्यासोबतच फेडरल रिजर्व (Federal Reserve) ने सुद्धा व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)