Indian Railway: ट्रेनमध्ये विनातिकिट प्रवास करत असाल तर सावधान, रेल्वेकडून चालवले जाणार विशेष अभियान
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी ट्रेन पूर्णपणे बंद केल्या होत्या. यामुळे बहुतांश नागरिकांना त्रास झाला होता. परंतु कोरोनाची दुसरी लाट जशी ओसरत गेली तशी ट्रेन पुन्हा सुरु करण्यात आली. नुकत्याच रेल्वेकडून कोविड19 स्पेशल ट्रेन टॅग सुद्धा हटवण्यात आले. परंतु रेल्वे सुरु झाल्यानंतर आता विनातिकिट लोक प्रवास करत आहेत. अशातच आता रेल्वेकडून विशेष अभियान सुरु केले जाणार आहे.(Indian Navy Day 2021 Wishes: राष्ट्रपती Ram Nath Kovind ते Sharad Pawar यांच्याकडून नौसेना दिनाच्या शुभेच्छा)
पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या सर्व पाच स्थानकांची तपासणी केली जाणार आहे. त्यानुसार धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 1 महिन्यात ईसीआरच्या सर्व स्थानकांमध्ये चेकिंग दरम्यान, साडे तीन लाखांहून अधिक अशा लोकांना पकडले आहे जे ट्रेनमध्ये विनातिकिट प्रवास करत होते. यामाध्यमातून 20 कोटी रुपयांचा दंड वसूल केला गेला आहे.
खरंतर विनातिकिट प्रवास करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. त्यानुसार, योग्य प्रवाशांना प्रवास करताना जाणार समस्यांचा सामना करावा लागणार नाही. यासाठी विविध ठिकाणी टीम तयार केली जाणार आहे. त्यांच्याकडूनच विशेष तिकिट तपास अभियान चालवले जाईल.(ATM मधून पैसे काढण्यासाठी पुढील महिन्यापासून स्विकारण्यात येणार अतिरिक्त शुल्क, जाणून घ्या अधिक)
गेल्या महिन्यात विनातिकिट प्रवास करणाऱ्यांची 3 लाख 49 हजार 340 प्रकरणे समोर आली होती. त्यांच्याकडून 20 कोटी 10 लाखांहून अधिक दंड स्विकारला गेला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, कोविड19 च्या काळात 2019 नोव्हेंबरच्या तुलनेत नोव्हेंबर 2021 मध्ये विनातिकिट प्रवास करणाऱ्यांकडून वसूल करण्यात आलेला दंड हा 40.67 टक्के अधिक आहे.