राजस्थान : श्री गंगानगर सेक्टर परिसरात पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात भारतीय आर्मीला यश, एअर स्ट्राईक नंतर आज तिसरं ड्रोन
यापूर्वी गुजरात येथील कच्छ आणि राजस्थानातील बिकानेर परिसरातही पाकिस्तानी ड्रोन पाडले होते.
राजस्थान येथील श्री गंगानगर सेक्टर (Sri Ganganagar sector) परिसरात भारताच्या आंतरराष्ट्रीय हद्दीमध्ये घुसणाऱ्या एका पाकिस्तानी ड्रोनला पाडल्याची माहिती देण्यात आली आहे. ANI ने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय आर्मीने (Indian Army ) आज राजस्थानमध्ये ही कारवाई केली आहे. बालाकोट परिसरात भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर आज तिसऱ्यांदा पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आलं आहे. यापूर्वी गुजरात येथील कच्छ आणि राजस्थानातील बिकानेर परिसरातही पाकिस्तानी ड्रोन पाडले होते. बिकानेरमध्ये भारताच्या सुखोई 30 ने पाकिस्तानचे ड्रोन पाडले
जैश ए मोहम्म्द या दहशतवादी संघटनेचा तळ उद्धवस्त करण्यासाठी भारताकडून पाकव्याप्त काश्मिरमध्ये बालाकोट परिसरात एअर स्ट्राईक करण्यात आला होता. त्यांनतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध तणावाचे झाले आहेत. सध्या देशभरात हाय अलर्ट असून सीमेलगतच्या भागामध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.