भारतात COVID19 चा रिकव्हरी रेट 63.92 टक्क्यांवर पोहचला; 36,145 रुग्णांची प्रकृती सुधारल्याची आरोग्य विभागाची माहिती
तसेच देशात आणखी 36,145 रुग्णांची प्रकृती सुधारल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
भारतात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 13 लाखांच्या पार गेला आहे. देशातील बहुतांश राज्य ही कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने तेथील स्थानिक प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून वेळोवेळी उपाययोजना करत आहेत. याच दरम्यान, आता भारतात कोविड19 च्या रुग्णांचा रिकव्हरी रेट 63.92 टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच देशात आणखी 36,145 रुग्णांची प्रकृती सुधारल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
तसेच देशात कोरोनासंक्रमितांचा मृत्यूदक 2.31 टक्क्यांवर आल्याचे ही आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारतात 24 तासांत देशात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल (25 जुलै) दिवसभरात 48,661 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 705 रुग्ण दगावले असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 13,85,522 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 32,063 वर जाऊन पोहोचला आहे. देशात सद्य घडीला 4,67,882 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. तसेच आतापर्यंत एकूण 8,85,577 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.(कोरोना व्हायरस महामारीमध्ये केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लाँच केला 'भाभी जी पापड'; 'Coronavirus शी लढायला होईल मदत' Watch Video)
देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 लाख 66 हजार 368 वर पोहोचली आहे. राज्यात 1 लाख 45 हजार 481 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 2 लाख 7 लाख 194 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली आणि गुजरात मध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.