भारतात कोरोना व्हायरसचे 'Community Transmission' असल्याच्या IMA च्या दाव्यावर गंगाराम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुमार यांची सहमती

कम्युनिटी ट्रान्समिशनचे संक्रमण झालेल्या व्यक्तीला कळणार सुद्धा नाही त्याला कोठून त्याची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचे सोर्स शोधून काढणे हे चिंता वाढवण्यासारखे आहे

Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांनी असा दावा केला आहे की, भारतात कोरोना व्हायरसचे कम्युनिटी ट्रान्समिशन (Community Transmission) सुरु झाले आहे. कम्युनिटी ट्रान्समिशनचे संक्रमण झालेल्या व्यक्तीला कळणार सुद्धा नाही त्याला कोठून त्याची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचे सोर्स शोधून काढणे हे चिंता वाढवण्यासारखे आहे. याच दरम्यान सर गंगाराम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुमार यांनी असे म्हटले आहे की, गेल्या काही काळापासून भारतात कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन वाढत चालल्याचे दिसून आले आहे. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, दिल्ली आणि मुंबईतील धारावीत ज्या पद्धतीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहिल्यास भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झाले आहे.

डॉ. अरविंद कुमार यांनी पुढे असे ही म्हटले की, ज्या पद्धतीने कोरोनाचे प्रत्येक दिवशी रुग्ण आढळून येत आहेत त्यावरुन तुम्ही निष्कर्ष काढू शकता. त्यामुळे आयएमए यांच्या दाव्याशी मी सहमत असल्याचे ही कुमार यांनी स्पष्ट केले आहे. ही गोष्टी आश्चर्यचकित करण्यासारखी सुद्धा नाही आहे.(Coronavirus Update India: देशातील कोरोना व्हायरस रुग्णांचा रिकव्हरी रेट 62.93% वर; आतापर्यंत 6,53,751 जणांची कोरोनावर मात)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी असे म्हटले आहे की. कोविड19 च्या रुग्णांचा मृत्यूदर घटना असून याचे श्रेय रुग्णांसह आरोग्यविभागाला जाते. भारत हा जगात सर्वात कमी मृत्यूदर असणाऱ्या दैशांपैकी एक आहे. भारतात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने कोरोनाच्या व्हायरसच्या रुग्णांचा आकडा 30 हजारांहून अधिक आढळून येत आहे. त्याचसोबत कोरोना संक्रमितांचा आकडा 10,38,716 वर पोहचला आहे. यामध्ये 26,273 जणांचा बळी गेला आहे. तर 6,53,750 जणांची प्रकृती सुधारली असून अद्याप 3,58,692 संक्रमित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.