कोरोना व्हायरस महामारीमध्ये केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लाँच केला 'भाभी जी पापड'; 'Coronavirus शी लढायला होईल मदत' (Watch Video)

जगातील जवळजवळ सर्व देश याबाबतची लस अथवा औषध शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. ज्यात बरेच देश काही प्रमाणात यशस्वी झाल्याचा दावाही करीत आहेत. पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अर्जुनराम मेघवाल (Arjun Ram Meghwal) यांनी

Union Minister Arjun Ram Meghwal Launches 'Bhabhi Ji Papad' (Photo Credits: Twitter)

देशभरात कोरोना विषाणूची (coronavirus) प्रकरणे वाढत आहेत.  जगातील जवळजवळ सर्व देश याबाबतची लस अथवा औषध शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. ज्यात बरेच देश काही प्रमाणात यशस्वी झाल्याचा दावाही करीत आहेत. पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अर्जुनराम मेघवाल (Arjun Ram Meghwal) यांनी एका खाजगी कंपनीचा ‘भाभीजी पापड’ (Bhabhi Ji Papad) लाँच केला आहे. कोरोना विषाणूविरूद्ध लढायला या पापडाची मदत होईल, असा दावा त्यांनी केला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पापडबद्दल माहिती देताना ते सांगत आहेत की, आत्मनिभार भारत कार्यक्रमांतर्गत कोरोना व्हायरसच्या या लढाईत, हा पापड रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करू शकतो.

सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिला जात आहे. हे लक्षात घेता, बहुतेक कंपन्या असे खाद्यपदार्थ लॉन्च करण्यात गुंतलेली आहेत जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतील.  मात्र, संसदीय कामकाज मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सादर केलेल्या पापडाबद्दल सोशल मिडियावर सध्या नाराजीचा सूर उमटलेला दिसत आहे. संसदीय कार्यमंत्री अर्जुनराम मेघवाल हे एका खासगी कंपनीचे ‘भाभी जी पापड' लाँच करण्यासाठी आले होते. त्यांनी या कार्यक्रमात जे काही बोलले ते आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

बुधवारी बीकानेरचे खासदार अर्जुनराम मेघवाल यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे की, बीकानेरच्या या पापड कंपनीतील लोक अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे आले होते व त्यांनी सांगितले की या पापडामध्ये प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गिलोय व इतर गोष्टी समाविष्ट आहेत, जे कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी प्रभावी आहे. त्यानंतर मेघवाल यांचा याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

यासह बिकानेरचे पापड, भुजिया रसगुल्ला सर्वश्रुत आहेत, असे म्हणत #VocalforLocaL मोहीमेला पाठींबा देण्यासाठी, आपल्या क्षेत्रातील स्थानिक उत्पादनांना समर्थन देण्याचे आवाहान त्यांनी इतरांनाही केले आहे.