IIL-ICMR MoA For Zika Vaccine: इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड आणि आयसीएमआर करणार झिका लस निर्मिती, एमओएवर स्वाक्षरी
या दोन्ही प्रस्तावांवर सदर संस्थांनी स्वाक्षरी केली असून या संस्था झिका लस (Zika Vaccine) निर्मितीच्या वैद्यकीय विकासासाठी प्रयत्न करतील.
लस (Vaccine) निर्माती इंडियन इम्योनूलॉजीकल लिमिटेड (Indian Immunological Limited) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च (ICMR) यांच्यात एक मेमोरेंडम ऑफ असोसिएशन (MoA) मंजूर केला आहे. या दोन्ही प्रस्तावांवर सदर संस्थांनी स्वाक्षरी केली असून या संस्था झिका लस (Zika Vaccine) निर्मितीच्या वैद्यकीय विकासासाठी प्रयत्न करतील. एमओएनुसार, आयसीएमआर तिसऱ्या टप्प्यातील क्लिनीकल चाचणीसाठी गुंतवणूक करेल. ज्यामध्ये नैदानिक चाचणीचे अनुसरण, आयोजन, तपासणी अशा घटकांचा समावेश आहे. ही चाचणी आयसीएमआरच्या भारतीय नेटवर्कमध्ये घेतली जाईल.
माफक दरात लसनिर्मिती
इंडियन इम्यूनोलॉजिकल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद कुमार म्हणाले की, आयसीएमआरसोबत झिका लस निर्मितीसाठी एमओए होणे, ही आमच्यासाठी (IIL) आनंदाची बाब आहे. आयआयएलही भारताला लस क्षेत्रात स्वयंसिद्धता मिळवून देणारी सर्वात मोठी भागिदार राहिली आहे. लोकांना अत्यंत माफक आणि परवडेल अशा दरात जटील आजारांवर परिणामकारक आणि प्रभावी लस उपलब्ध करुन देणे हे आमचे उद्दीष्ट आहे. कोडॉन डी-ऑप्टिमाइज्ड व्हायरल लसींसह नवीन लस प्लॅटफॉर्मच्या विकासावर आमचे काम सुरु असून, त्याला यश येऊ लागल्याचेही आनंद कुमार यांनी सांगितले. (हेही वाचा, Effects of Dengue on Human Body: डेंग्यू आजाराचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ काय सांगतात? घ्या जाणून)
आत्मनिर्भर भारत आणि विकसीत भारत निर्मितीसाठी योगदान
आयसीएमआरचे डीजी डॉ. राजीव बहल यांनी सांगितले की, आत्मनिर्भर भारत आणि विकसीत भारत याच्यादृष्टीने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे हा एमओए आहे. आयसीएमआरने पहिल्या टप्प्यातील चाचणी पाठिमागील वर्षात साजर केली. जी मानवी सूविधा केंद्रस्थानी ठेऊन काम करते. ज्यामध्ये लहान रेणू, जीवशास्त्र आणि लसीकरण आदींचा सामवेश आहे. चार फेज-I साइट्स - ACTREC मुंबई, KEM हॉस्पिटल मुंबई, SRM चेन्नई आणि PGIMER चंदीगड - पूर्णपणे कार्यरत असल्याने, भारतीय नवकल्पकांना यापुढे फेज-I चाचण्यांसाठी परदेशात जाण्याची गरज नाही, असेही डॉ. बहल म्हणाले.
दरम्यान, आयआयएलचे उपसंचालक डॉ. प्रियभारत पटनायक यांनी सांगितले की, आम्ही खास करुन व्हायरल आजारांवर लक्ष ठेऊन लसनिर्मीतीचे उद्दीष्ट ठेवत आहोत. सध्यास्थिती आम्ही दुर्लक्षीत असलेल्या आजारांवर लसनिर्मीती करु पाहात आहोत. झिका, कायसनूर फॉरेस्ट डिसीज (KFD), चिकुनगुनिया आणि SARS-CoV-2 इंट्रा-नासल बूस्टर लस अशी त्याची काही नावे आहेत.
झिका व्हायरल लक्षणे आणि आजार
झिका हा एक विशाणूजन्य आजार आहे. त्याला ताप असेही म्हटले जाते. हा आजार डास चावल्याने होतो. सामान्यता एडीस नावाचा डास चावल्याने त्याची लागण होते. त्याची लक्षणे साधारण असतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, पुढे ही लक्षणे डेंग्यू, चिकुनगुनिया आणि गंभीर तापामध्ये परावर्तीत होतात. हे परावर्तन रुग्णासाठी त्रासदायक असते.
झिका आजाराची लक्षणे: ताप, त्वचेवर पुरळ,डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, पापणीच्या खालच्या बाजूला जळजळ, डोळे लाल होणे.
झिका ची लागण झालेल्या बहुतेक लोकांना लक्षणे नसतात किंवा फक्त 2-7 दिवस टिकणारी सौम्य लक्षणे असतात. तथापि, झिका मुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात, विशेषतः गर्भवती महिलांसाठी. जर तुम्ही गर्भवती असाल किंवा गर्भवती होण्याचा विचार करत असाल तर डासांना स्वत:पसून दूर ठेवा. त्यासाठी अतिरिक्त काळजी घ्या.