जर तुमच्या घरी उशिराने LPG आल्यास तक्रार करा, विक्रेत्याचे कापले जाणार कमिशन
मात्र आता विक्रेत्यांनी ग्राहकांना वेळेवर एलपीजी न दिल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
गॅस सिलेंडरच्या ग्राहकांना विक्रेत्यांची नेहमीच मनमानी सहन करावी लागते. मात्र आता विक्रेत्यांनी ग्राहकांना वेळेवर एलपीजी न दिल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. तेल मार्केटिंग कंपन्यांच्या प्रस्तावानुसार विक्रेत्यांच्या विरोधात सेवेसंबंधित अधिक तक्रारी असल्यास त्याला मिळणारे कमिशन कापण्यात येणार आहे. हा प्रस्ताव तेल कंपन्यांनी पेट्रोलियम मंत्रालयाकडे पाठवला आहे. अशी आशा आहे की पेट्रोलियम मंत्रालय या प्रस्तावाला मंजूरी देईल.
विक्रेत्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसवण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. त्याचसोबत ग्राहकांना गॅस सिलिंडर वेळच्या वेळी उपलब्ध होण्यासोबत अन्य उत्तम सुविधा सुद्धा मिळवता येतील. तसेच विक्रेत्यांना त्यांच्या सेवेत अधिक बदल करणे महत्वाचे ठरणार आहे. नियमानुसार 24 ते 48 तासाच्या आतमध्ये ग्राहकांना गॅस सिलिंडर बुक करुन सुद्धा न दिल्यास कारवाई होणार आहे. तसेच गॅस सिलिंडर विक्रेत्यांना 5 स्टारची रेटिंगसुद्धा लागू करण्यात येणार आहे. ग्राहकांकडून जर एखाद्या विक्रेत्याला 2 स्टार दिल्यास त्याच्या विरोधात कारवाई होणार आहे.(खुशखबर! घरगुती गॅस सिलेंडर झाला स्वस्त, काय आहेत नवीन दर)
पेट्रोलियम मंत्रालयाला पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावाला मंजूरी दिल्यानंतर विक्रेत्याची सर्विस ही कमिशन सोबत लिंक करण्यात येणार आहे. तुमच्या माहितीसाठी म्हणून विक्रेत्यांना एका सिलिंडरच्या पाठी साठ रुपये कमिशन मिळते. तेल कंपन्यांच्या प्रस्तावात असे म्हटले आहे की, परफॉर्मन्सच्या आधारावर पेनाल्टी किंवा कमिशनचे निर्धारण केले जाते. त्यामध्ये अशी सुद्धा सिफारिश करण्यात आली आहे की, कमिशनमध्ये 20 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात येऊ शकते.