खुशखबर! घरगुती गॅस सिलेंडर झाला स्वस्त, काय आहेत नवीन दर
Gas Cylinder (Photo Credits: Twitter)

विधानसभा निवडणुका (Assembly Election 2019) तोंडावर आलेल्या असताना मोदी सरकारने सामान्य जनतेसाठी गूड न्यूज दिली आहे. सलग दुस-या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या (LPG Gas) दरात मोठी कपात केली आहे. विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती घसरल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी जुलैमध्ये विनाअनुदानित गॅस सिलेंडरचे दर 100.50 रुपयांनी कमी करण्यात आले होते. त्यामुळे दोन महिन्यात एकूण मिळून विनाअनुदानित प्रति गॅस सिलेंडरमध्ये 163 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात केल्यानंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन  (IOC)च्या माहितीनुसार, आता एलपीजी गॅस सिलेंडरचे बाजारातील किंमत 574.50 रुपये असेल. हे नवे दर बुधवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत.

हेही वाचा- खुशखबर! मोदी सरकारची जनतेला मोठी भेट; घरगुती LPG गॅस सिलेंडर ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवे दर

गेल्या महिन्यात विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 100.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. 1 जुलैपासून हे गॅस सिलिंडरचे हे नवे दर लागू करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात दरकपात झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

तर दुसरीकडे अनुदानित सिलेंडरची खरेदी करताना बाजारमूल्याप्रमाणे पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र, सिलिंडरचे अनुदान बँकेत जमा झाल्यास प्रत्येक सिलेंडरसाठी 142.65 रुपये अनुदान मिळेल.