Hurun Global Rich List 2025: देशातील 284 अब्जाधीशांकडे जीडीपीचा एक तृतीयांश हिस्सा; सरासरी संपत्ती 34,514 कोटी, चीनला टाकले मागे

भारतात आता 284 अब्जाधीश असून, अमेरिकेत 870 अब्जाधीश आणि चीनमध्ये 823 अब्जाधीश आहेत. भारतात गेल्या वर्षभरात अब्जाधीशांची संख्या 13 ने वाढली आहे. या यादीतील 175 अब्जाधीशांनी त्यांची संपत्ती वाढवली, तर 109 जणांची संपत्ती कमी झाली किंवा स्थिर राहिली.

Mukesh Ambani, Gautam Adani (PC- PTI)

देशात 2024 मध्ये भारतामध्ये 284 अब्जाधीश असून, त्यांची संपत्ती 10 टक्क्यांनी वाढून 98 लाख कोटी रुपये किंवा देशांतर्गत जीडीपीच्या एक तृतीयांश झाली आहे. महत्वाचे म्हणजे ही संपत्ती सौदी अरेबियाच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अब्जाधीशाच्या सरासरी संपत्तीच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे. भारतातील प्रत्येक अब्जाधीशाची सरासरी संपत्ती 34,514 कोटी रुपये आहे, तर चीनमध्ये ती 29,027 कोटी रुपये आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या हुरुन ग्लोबल रिच लिस्टनुसार, अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत 1 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे, जी जगातील सर्वाधिक आहे. यासह त्यांची संपत्ती 8.4 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याच वेळी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची संपत्ती 13 टक्क्यांनी घटून 8.6 लाख कोटी रुपये झाली. त्यांनी पुन्हा एकदा सर्वात श्रीमंत आशियाई व्यक्तीचा किताब मिळवला आहे.

हुरुन रिच लिस्ट ही एक अशी वार्षिक यादी आहे जी जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची माहिती सादर करते. ही यादी हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने तयार केली असून, या संस्थेची स्थापना 1999 मध्ये रूपर्ट हूगवर्फ या ब्रिटिश व्यक्तीने केली होती. हुरुन रिच लिस्ट तयार करण्याची प्रक्रिया खूपच काटेकोर असते. हुरुनची टीम मोठ्या कंपन्या, स्टार्टअप्स आणि व्यक्तिगत संपत्तीशी संबंधित आर्थिक माहिती गोळा करते. ही माहिती बाजारातील आकडेवारी, कंपनीच्या शेअर मूल्यांचा अभ्यास आणि इतर विश्वसनीय स्रोतांवरून जमा केली जाते. त्यानंतर या सर्व माहितीचं विश्लेषण करून प्रत्येक व्यक्तीची एकूण संपत्ती ठरवली जाते आणि त्यानुसार त्यांना क्रमवारी दिली जाते.

भारतात आता 284 अब्जाधीश असून, अमेरिकेत 870 अब्जाधीश आणि चीनमध्ये 823 अब्जाधीश आहेत. भारतात गेल्या वर्षभरात अब्जाधीशांची संख्या 13 ने वाढली आहे. या यादीतील 175 अब्जाधीशांनी त्यांची संपत्ती वाढवली, तर 109 जणांची संपत्ती कमी झाली किंवा स्थिर राहिली. या यादीत सात तरुण अब्जाधीशांचाही समावेश आहे, जे 40 वर्षांखालील आहेत आणि मुख्यतः बंगळुरू आणि मुंबई या शहरांशी संबंधित आहेत. रेझरपेचे सहसंस्थापक शशांक कुमार आणि हर्षिल माथुर, दोघेही 34 वर्षांचे, हे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश आहेत, ज्यांची प्रत्येकी संपत्ती 8,643 कोटी रुपये आहे. (हेही वाचा: Yes Bank Receives Demand Notice: येस बँकेला आयकर विभागाकडून 2,209 कोटी रुपयांची डिमांड नोटीस; काय आहे प्रकरण? जाणून घ्या)

या यादीतून भारतातील उद्योगांचा बदलता चेहरा समोर येतो. आरोग्यसेवा क्षेत्राने सर्वाधिक 53 अब्जाधीश दिले, तर उपभोक्ता वस्तू आणि औद्योगिक उत्पादनांनी अनुक्रमे 35 आणि 32 अब्जाधीशांचे योगदान दिले. मुंबई हे 90 अब्जाधीशांसह भारतातील श्रीमंतांचे केंद्र राहिले आहे, परंतु शांघायने 92 अब्जाधीशांसह आशियातील अब्जाधीशांची राजधानी म्हणून मुंबईला मागे टाकले आहे. हुरुनच्या या यादीतून भारतातील संपत्ती निर्मितीचा वेग आणि वैविध्य दिसून येते. ही यादी दर्शवते की, भारत आता केवळ पारंपरिक उद्योगांवर अवलंबून नाही, तर नवीन क्षेत्रेही संपत्ती निर्मितीत योगदान देत आहेत. ही यादी तरुण उद्योजकांसाठीही प्रेरणादायी आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement