पराभूत होऊनही जिंकलेल्या ममता बॅनर्जी मुख्यमंत्री कशा होणार?, जाणून घ्या सविस्तर

त्यामुळे त्यांच्यासाठी पुन्हा एक मोठं आव्हान असणार आहे.

West Bengal CM Mamata Banerjee | (Photo Credits: ANI)

पश्चिम बंगालमधील (West Bengal) आपला करिश्मा आजही कायम आहे हे दाखवत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerji) यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत रिंगणात उतरून तृणमूल काँग्रेसने भाजपचा (BJP) धुव्वा उडवला. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या या लढतीत TMC ने भाजप दे धक्का देत सलग तिस-यांदा सत्ताशिखर गाठले आहे. मात्र दुसरीकडे ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तृणमूलचे बंडखोर नेते व भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी ममतांना 1 हजार 736 मतांनी पराभूत केलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी पराभूत होऊनही कशा मुख्यमंत्री होणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

ममता दीदी पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या तरी त्यांना सहा महिन्याच्या आत विधान परिषदेवर निवडून जावं लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी पुन्हा एक मोठं आव्हान असणार आहे.

हेदेखील वाचा- West Bengal Election 2021 Results: नंदीग्राम मध्ये जनतेला हवा तो निकाल लागला आणि मी त्याचा स्वीकार करते- ममता बनर्जी

भारतीय संविधानातील कलम 164 (4) प्रमाणे, “एखादा मंत्री जो सलग सहा महिन्यांपर्यंत कोणत्याही राज्याच्या विधानसभेचा सदस्य नसल्यास त्या कालावधीच्या समाप्तीनंतर (सहा महिन्यानंतर) त्याला मंत्री म्हणून कार्यरत राहता येणार नाही."

ममता पराभूत झाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदी कशा विराजमान होऊ शकतात याबद्दल संविधानविषयक तज्ज्ञ असणाऱ्या सुभाष कश्यप यांनी इंडियन एक्सप्रेसशी चर्चा केली. "त्या (ममता बॅनर्जी) मुख्यमंत्री बनू शकतात. मुख्यमंत्री हा सुद्धा एखाद्या मंत्र्याप्रमाणेच असतो. त्याच्याकडेही अधिकार असतात. संविधानानुसार कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसणारी व्यक्ती सहा महिन्यासाठी मंत्री बनू शकते. मात्र या सहा महिन्याच्या कालावधी त्या व्यक्तीला निवडून येणं गरजेचं असतं. ती व्यक्ती निवडून आल्यानंतरच तिला मंत्री म्हणून पुढे कार्यरत राहता येतं," असं कश्यप यांनी सांगितलं. मात्र सहा महिन्यांमध्ये ती व्यक्ती निवडून आली नाही तर त्या व्यक्तीला मंत्रीपद गमावावे लागते, असं कश्यप यांनी स्पष्ट केलं.

थोडक्यात ममता दींदींचा संघर्ष अजून संपला नसून त्या या लढाईत सुद्धा जिंकतली अशा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. भाजपवर तृणमूल काँग्रेसने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.