How to increase Instagram Followers: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्या कशी वाढवाल? जाणून घ्या 'या' सोप्प्या ट्रिक्स

Instagram (Photo Credits-File Image)

बदलत्या जीवनशैलीनुसार प्रत्येकजण हा स्वत:मध्ये ट्रेन्ड नुसार बदल करण्यास प्रयत्न करत आहेत. याच सर्वाधिक प्रभाव सोशल मीडियात दिसून येत आहे. कारण सोशल मीडिया असे एक माध्यम आहे जे जगभरातील लोकांपर्यंत पोहचण्यास मदत करते. अशातच सोशल मीडियातील विविध असे काही अॅप आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची कला एखाद्या समोर सादर अगदी सहज सादर करु शकता. याच दरम्यान आता टिकटॉकसह अन्य चीनी अॅपवर बंदी घातल्यानंतर इन्स्टाग्रामने टिकटॉकसारखे फिचर्स देण्यास सुरुवात केली आहे. पण जर तुम्ही इन्स्टाग्रामवरील एखाद्या व्यक्तीचे फॉलोअर्स हजारो, लाखोंच्या संख्येने पाहता. तेव्हा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडत असेल की या व्यक्तीच्या फॉलोअर्सची संख्या ऐवढी कशी? यासाठी ते काय करत असतील? असे सगळे प्रश्न तुम्हाला सुद्धा पडत असल्यास आम्ही येथे तुमची मदत करणार आहोत.

इन्स्टाग्रामवर जर तुम्हाला सुद्धा तुमच्या फॉलोअर्सची संख्या वाढवायची असल्यास काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तसेच या पर्यांयांचा जर तुम्ही वापर केल्यास ते तुमच्यासाठीच फायदेशीर ठरु शकते. तर पहा कोणत्या आहेत या सोप्प्या ट्रिक्स-(Facebook, Instagram Down: सोशल मीडिया फेसबुक व इंस्टाग्राम डाऊन; ट्वीटरवर तक्रार करत वापरकर्त्यांनी पोस्ट केले भन्नाट मीम्स See Tweets)

1) आकर्षक बायो (Attractive Bio)-

तुमच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर तुम्ही तुमची माहिती देण्यापूर्वी काही आकर्षक लाईन्स लिहिल्यास ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. जसे जर तुमचा ब्लॉग किंवा युट्यूब चॅनल असल्यास इन्स्टाग्राम हे तुमच्यासाठी उत्तम प्लॅटफॉर्म आहे. ज्यावेळी तुम्ही इन्स्टाग्रामवर तुमच्या युट्युब चॅनलची लिंक दिल्यास एखाद्याने तुमचे प्रोफाइल पाहिल्यानंतर त्याला तुम्ही दिलेली लिंक दिसेल. तेथे जर त्याने क्लिक केल्यास लिंकवरील कंन्टेंक समोरील व्यक्तीला पाहता येईल. त्यामुळे तुमचे Views वाढण्यास मदत सुद्धा होईल.

2) उत्तम पोस्ट-

नेहमीच लक्षात ठेवा की, ज्या कामासाठी तुम्ही इन्स्टाग्रामवर अकाउंट सुरु केले आहे त्यासंबंधितच पोस्ट अपलोड करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही नेहमीच कामाव्यतिरिक्त वेगळी पोस्ट अपलोड केल्यास लोक तुम्हाला फॉलो करणे टाळू शकतात.

3) हॅशटॅग-

ज्यावेळी तुम्ही एखादी पोस्ट अपलोड करता तेव्हा हॅशटॅगचा वापर जरुर करा. कारण तुमच्या हॅशटॅगवरुन लोक तुमची पोस्ट पाहू शकतात. पण उगाचच भरमसाठ हॅशटॅग देणे टाळा. याच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या फॉलोअर्सची संख्या वाढू शकते.

4) ट्रेन्डिंग पोस्ट-

नेहमीच ट्रेन्डिंग पोस्ट करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. तसेच जर तुमची ही ट्रेन्डिंग पोस्ट व्हायरल झाल्यास तुम्हाला तेथून सुद्धा अधिक फॉलोअर्सची संख्या मिळू शकते.

5) अॅक्टिव्ह रहा-

इंन्स्टाग्रामवर अधिक फॉलोअर्सची संख्या हवी असल्यास नेहमीच अॅक्टिव्ह राहा. त्यासाठी नेहमीच पोस्ट टाकणे गरजेचे नाही. कधी तरीह तुम्ही एखाद्या दुसऱ्याची पोस्ट लाईक करणे, फॉलो करणे किंवा कमेंट करणे अशा सुद्धा गोष्टी तुम्ही करा.

6) अकाउंट शेअर करा-

तुमचे इन्स्टाग्राम अकाउंट अधिकाधिक शेअर करण्यास विसरु नका. जसे फेसबुक किंवा ट्वीटरवर तुमचे अकाउंट शेअर करु शकता.

7) इंन्स्टाग्राम टूल्स-

तुम्ही Crowdfire अॅप डाउनलोड करुन त्याचा वापर करा. त्यामुळे तेथे तुम्हाला तुमची पोस्ट शेड्युअल केल्यानंतर ती ठरलेल्या वेळेत आपोआप पब्लिश होते.

8) पोस्ट करण्याची योग्य वेळ-

इन्स्टाग्रामवर एखादी पोस्ट तुम्हाला शेअर करायची असल्यास त्यावेळी वेळ पहाणे सुद्धा फार महत्वाचे आहे. कारण याचा फायदा तुम्हाला पोस्ट शेअर केल्यानंतर नक्कीच दिसून येईल. तसेच कोणत्या वेळी कोणती पोस्ट करावी हे सुद्धा ठरवा.(WhatsApp Crash Codes: व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्सला येतेय एक विचित्र समस्या, मेसेज मिळाल्यानंतर क्रॅश होतोय App)

तर वरील काही सोप्प्या टीप्स आणि ट्रिक्स वापरुन तुम्ही फॉलोअर्सची संख्या वाढवू शकता. तसेच इन्स्टाग्रामवर तुम्ही काही वेळेस लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याबद्दल किंवा तुम्ही कशासाठी अकाउंट सुरु केले आहे त्याबद्दल माहिती द्या. पण मात्र एखाद्या वादग्रस्त प्रकरणावर बोलणे टाळा. अन्यथा लोक तुम्हाला अनफॉलो सुद्धा करु शकता.