Homosexual Relationships: समलैंगिक संबंध ठरले पित्याच्या हत्येचे कारण, पोटच्या मुलाने संपवले जन्मदात्याचे जीवन
त्यातून त्याने वडीलांची हत्या केली. आोरपीने गुन्हा मान्य केला आहे. वडीलांचे समलैंगिक संबंध होते. त्यांना दारुचे प्रचंड व्यसन होते. तसेच, आपल्या समलैंगिक मित्रांना ते संपत्तीचा वाटाही देणार होते. त्यामुळे आपण त्यांचे जीवन संपवले असे मुलाने पोलिसांना दिलेल्या माहिती सांगितले आहे.
समलैंगिक संबंध (Homosexual Relationships) ठेवत असल्याच्या कारणावरुन मुलाने वडिलांची हत्या केली आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर (Muzaffarnagar) येथील खतौली (Khatauli) पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. वडीलांचे संमलैंगिक संबंध मुलाला आवडले नाहीत. त्यातून त्याने वडीलांची हत्या केली. आोरपीने गुन्हा मान्य केला आहे. वडीलांचे समलैंगिक संबंध होते. त्यांना दारुचे प्रचंड व्यसन होते. तसेच, आपल्या समलैंगिक मित्रांना ते संपत्तीचा वाटाही देणार होते. त्यामुळे आपण त्यांचे जीवन संपवले असे मुलाने पोलिसांना दिलेल्या माहिती सांगितले आहे.
घटनेबाबत माहिती अशी की, 18 ऑगस्ट 2021 या दिवशी रूकनपुर येथील रहीवासी असलेल्या ऋषिपाल याचा मृतदेह ओमप्रकाश याच्या ऊसाच्या शेतात छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली होती. दुसऱ्या बाजूला ऋषिपाल याचा मुलगा सुमित कुमार याने तीन व्यक्तींविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दिली होती. तपासादरम्यान पोलिसांना आरोपींपेक्षा मुलावरच अधिक संशय आला. त्यामुळे त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला पोलिसांना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर मात्र त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
सुमित कुमार याने पोलिसांना सांगितले की, वडीलांचे अनेक पुरुषांसोबत समलिंगी संबध असल्याने समाजात त्याची खिल्ली उडवली जात होती. सर्व लोक त्याला कमी लेखत असत. तसेच, वडीलांना दारुचे प्रचंड व्यसन होते. त्यातून ते आपली संपत्तीही त्यांच्या समलैंगिक संबंध असलेल्या मित्रांना देणार होते, असे मला समजले होते. त्यातून संतापाच्या भरात आपण हे कृत्य केल्याचे सुमित कुमार याने पोलिसांना सांगितले. चाकूने भोसकून आपण वडिलांची हत्या केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. (हेही वाचा, Axis Bank New Policies For LGBTQIA : 'एलजीबीटीक्यू' ग्राहक, कर्मचाऱ्यांना वापरता येणार ‘एमएक्स’ पर्याय, अॅक्सिस बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय)
पोलिसांनी केलेल्या चौकशीत पुढे आले की, ऋषिपाल याच्याकडे दोन वर्षांपूर्वी दोन एकर जमीन होती. त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी कर्ज घेतले. कर्जातील रकमेतील एकही रुपया त्याने मुलगा सुमित कुमार याला दिले नव्हते. त्यावरुन त्याचा वडिलांशी अनेकदा वाद झाला होता. ऋषिपाल याला दारुचेही प्रचंड व्यसन होते. तो गावातील लोकांकडून उधार दारु प्यायचा. त्याचे पैसे सुमित कुमार याला द्यावे लागायचे. गावातीलच एका व्यक्तीशी त्याचे लैंगिक संबंध होते. तसेच, आपल्या मालमत्तेतील काही भाग ते समलैंगिक पार्टनरलाही देण्याच निर्णय त्यांनी घेतला होता. आरोपी सुमित कुमार याला पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी तुरुंगात झाली आहे.