Fastag 'या' ठिकाणी दिला जात आहे फ्री, आजच घ्या नाहीतर दुप्पट टोल भरावा लागेल
मात्र जर तुमच्याकडे फास्ट टॅग नसल्यास चालकाला टोलची दुप्पट रक्कम मोजावी लागणार आहे.
येत्या 15 डिसेंबर पासून तुम्हाला महामार्गावर टोल प्लाझा येथे फास्ट टॅग दाखवावा लागणार आहे. मात्र जर तुमच्याकडे फास्ट टॅग नसल्यास चालकाला टोलची दुप्पट रक्कम मोजावी लागणार आहे. तर अशा काही ठिकाणी चालकांना फास्टॅग फ्री मध्ये दिला जात आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा फास्टॅग घ्या नाहीतर दुप्पट रक्कम टोल नाक्यावर मोजावी लागणार आहे.
आरएफआयडी किंवा रेडिओ फ्रिक्वेंसी इन्फ्रारेड डिवाइस, एक छोटा स्टिकर स्टिकर असून तो चालकाला त्यांच्या गाडीवरील पुढील काचेवर लावावा लागणार आहे. याच स्टिकरला फास्टॅग असे म्हटले जाते. सरकार फास्टॅगचा अन्य ठिकाणी वापर व्यवहारासाठी करण्यात यावा याचा सुद्धा विचार करत आहे. सरकारची ही योजना पेट्रोल, पार्किंग, पेट्रोल भरण्यासाठी वापरण्यात यावी यावर अद्याम काम सुरु आहे.
'या' ठिकाणी फ्री मध्ये देण्यात येत आहे फास्टॅग
अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना सुरुवातीच्या महिन्यांसाठी फास्टॅग फ्री करण्यात आला आहे. त्याचसोबत सरकारकडून 2.5 टक्के कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. तसेच कोटक महिंद्रा बँकेने सुद्धा 15 डिसेंबर पर्यंत त्यांच्या ग्राहकांना फास्टॅग फ्रीमध्ये खरेदी करता येणार आहे. तर खासगी क्षेत्रामधील सर्वात मठी बँक एचडीएफसी यांनी सुद्धा 31 डिसेंबर पर्यंत फास्टॅग फ्री केला आहे. एचडीएफसी बँकेने ग्राहकांना 100 रुपये प्रोसेसिंग फी वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.
कसे बनवाल फास्टॅग पास:
IHMCL/NHAI द्वारा 28,500 विक्री केंद्रावरुन तुम्हील हा पास खरेदी करु शकता. यत प्लाझा, आरटीओ, साझा सेवा केंद्र, परिवहन केंद्र, बँकेच्या शाखांचा समावेश आहे.
या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे डिजिटल पेमेंटला आणखी प्रोत्साहन देणे आणि त्याचा प्रसार करणे. या फास्टॅगमध्ये ओळख पटण्यासाठी (RFID) तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. ज्याच्या माध्यमातून फास्टॅग लावलेले चार चाकी वाहन जेव्हा टोलनाक्यावर जाईल तेव्हा तेथील खांब्यावर लागलेला स्कॅनर गाडीवर लावलेल्या स्टीकर ला स्कॅन करेल. ज्यामुळे फास्टॅग अकाउंटवरुन पैसे सरळ कट होतील. हा स्टीकर देशभरात कुठेही प्रवास करताना कामी येईल.