Tej Pratap Yadav and Aishwarya's Divorce Case: तेज प्रताप यादव आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोट प्रकरणावर आज सुनावणी; प्रेमसंबंध उघडकीस आल्याने नवा ट्विस्ट

अलिकडेच तेज प्रताप यादव यांचे अनुष्कासोबतच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते, त्यानंतर आरजेडी सुप्रीमोने तेज प्रताप यादव यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे. तेज प्रताप यादव यांनाही कुटुंबाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

Tej Pratap Yadav and Aishwarya's Divorce Case: तेज प्रताप यादव आणि ऐश्वर्या रायच्या घटस्फोट प्रकरणावर आज सुनावणी; प्रेमसंबंध उघडकीस आल्याने नवा ट्विस्ट
Tej Pratap Yadav (फोटो सौजन्य - फेसबुक०

Tej Pratap Yadav and Aishwarya's Divorce Case: आज तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या घटस्फोट प्रकरणाची (Divorce Case) सुनावणी कौटुंबिक न्यायालयात होणार आहे. अनुष्काचा भाऊ आकाश यादव याने यावेळी मोठा आरोप केला आहे आणि म्हटले आहे की, लालू कुटुंब आमच्या कुटुंबाची बदनामी करत आहे. लालू कुटुंब आम्हाला मारूनही टाकू शकते.

अलिकडेच तेज प्रताप यादव यांचे अनुष्कासोबतच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते, त्यानंतर आरजेडी सुप्रीमोने तेज प्रताप यादव यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले आहे. तेज प्रताप यादव यांनाही कुटुंबाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याशिवाय, लालू यादव यांनी असेही स्पष्ट केले आहे की ज्यांचे तेज प्रतापशी संबंध आहेत त्यांनी त्यांच्याशी संबंध ठेवण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा. (हेही वाचा - Tej Pratap Yadav Expelled From RJD: लालू प्रसाद यादव यांनी मुलगा तेजप्रताप यादव ला 6 वर्षांसाठी पक्षातून टाकले काढून; 'बेजबाबदार वर्तन'मुळे कुटुंबातूनही बेदखल)

आज कौटुंबिक न्यायालयात सुनावणी -

लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांचे वैवाहिक आयुष्य सध्या बिहारमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. तथापी, आज तेज प्रताप आणि ऐश्वर्याच्या घटस्फोट प्रकरणाची सुनावणी कौटुंबिक न्यायालयात होणार आहे. दुसरीकडे, अनुष्का यादव यांचा भाऊ आकाश यादव यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबावर मोठा आरोप केला आहे. Tejaswi vs Tej Pratap In Bihar: राष्ट्रीय जनता दल पक्षात पुन्हा एकदा तेजस्वी विरुदध तेजप्रताप, सुप्रीमो लालू प्रसाद यादव कोणाच्या बाजूने? 

तेज प्रताप यादव आणि ऐश्वर्या राय यांचे 12 मे 2018 रोजी लग्न झाले. त्यानंतर 3 नोव्हेंबर 2018 रोजी तेज प्रताप यादव आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची याचिका न्यायालयात पोहोचली. त्यानंतर 13 सप्टेंबर 2019 रोजी ऐश्वर्या तेज प्रताप यांचे घर सोडून निघून गेली. 24 मे 2025 रोजी तेज प्रताप यादव यांनी अनुष्का यादवसोबतचे प्रेम सार्वजनिक केले. 25 मे 2025 रोजी लालू यादव यांनी तेज प्रताप यादव यांना पक्ष आणि कुटुंबातून काढून टाकले. आज 29 मे रोजी तेज प्रताप यादव आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणाची सुनावणी कौटुंबिक न्यायालयात होणार आहे. या संपूर्ण प्रकरणावरून बिहारचे राजकारण तापले आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 29, 2025 01:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).