Gujarat Shocker: परिक्षेत उत्तम गुण देण्याच्या बहाण्याने खासगी शाळेतील शिक्षकाचा 16 वर्षीय मुलीवर बलात्कार, दागिने चोरण्यासही केली बळजबरी
गुजरात मधील कच्छ येथे एका 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तर शाळेतील शिक्षकानेच मुलीवर बलात्कार केल्याची बाब उघडकीस आली आहे.
Gujarat Shocker: गुजरात मधील कच्छ येथे एका 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तर शाळेतील शिक्षकानेच मुलीवर बलात्कार केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी 46 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. जय ठक्कर असे आरोपीचे नाव आहे. ही घटना गेल्या वर्षात ऑक्टोंबर महिन्यात मुंद्रा शहरात घडली. मुलीला परिक्षेत उत्तम गुण देतो या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. त्याचसोबत मुलीला दागिने चोरण्यासाठी सुद्धा बळजबरी केली गेली.
आरोपीच्या विरोधात मंगळवारी कारवाई करण्यात आली. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुलीच्या पालकांनी अशी तक्रार केली की त्यांच्या घरातून 1.2 लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली. तपासादरम्यान मुलीने आपला गुन्हा कबुल केला. तिने असे ही म्हटले की, ठक्कर यांच्या सांगण्यावरुन दागिने चोरले.(Bihar Shocker: हुंड्यासाठी नवऱ्याने बायकोसह 3 वर्षाचा मुलाला जीवंत जाळले, सुपौल जिल्ह्यातील घटना)
मुलीने संपूर्ण घटनेचा चौकशीवेळी खुलासा केला. परिक्षेत उत्तम गुण देण्याच्या बहाण्याने ठक्कर याने ऑक्टोंबर महिन्यात तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. त्याचसोबत डिसेंबर महिन्यात दागिने चोरण्यास भाग पाडले.
ठक्कर हा विवाहित असून त्याचा परिवार मुंबईत राहतो. मुंद्रा येथील एका प्रसिद्ध शाळेत तो नोकरी करतो. त्याच्यावर कर्ज असल्याने त्याला ते फेडायचे होते. त्यामुळेच त्याने मुलीला तिच्या घरात चोरी करण्यास सांगितले. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात चोरी आणि बलात्काराच्या गुन्हाअंतर्गत कारवाई केली आहे. आतापर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. परंतु या प्रकरणी अधिक सखोल तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2022 06:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

