Gujarat Shocker: गुजरातमध्ये विद्यार्थ्याचे अमानुष रॅगिंग; प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवला टूथब्रश, सॅनिटायझर टाकले, केला लैंगिक अत्याचार
मुलाने दोन दिवसांपूर्वी आपल्या बहिणीला घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली होती. त्यानंतर बहिणीने त्यांच्या वडिलांना ही माहिती दिली.
गुजरातच्या (Gujarat) राजकोटमध्ये रॅगिंगचे (Ragging) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शहरातील एका खासगी विद्यापीठात मुलासोबत रॅगिंगची ही भयानक घटना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथे सिनियर विद्यार्थ्यांनी 19 वर्षीय ज्युनियर विद्यार्थ्याचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करून त्याच्यावर पाच विद्यार्थ्यांनी लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, विद्यार्थ्यांनी क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडून, पीडित विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सॅनिटायझर आणि मध टाकला.
याद्वारे मनाचे समाधान न झाल्याने त्यांनी त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेन्सिल आणि टूथब्रशही टाकला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. वृत्तानुसार, या धक्कादायक घटनेतील एक आरोपीही अल्पवयीन आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी पीडित विद्यार्थ्याला धमकावल्याचीही माहिती मिळाली आहे. पाच आरोपींपैकी तीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच वेळी, अल्पवयीन विद्यार्थ्याला अद्याप ताब्यात घेतलेले नाही. पोलिसांनी सांगितले की, त्यांना मोरबी रोडवर असलेल्या मारवाडी विद्यापीठाच्या वसतिगृहातून या घटनेची माहिती मिळाली होती.
विद्यार्थ्याने सांगितले की, गेल्या महिन्यात तीन विद्यार्थ्यांनी आंघोळ करताना त्याचा न्यूड व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्या लोकांचे म्हणणे न ऐकल्यास तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी त्याला दिली होती. विद्यार्थ्याने सांगितले की, त्याच्या सिनियर्सनी त्याचा मानसिक छळ करून अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार केले. (हेही वाचा: ओयो हॉटेलमध्ये छुपे कॅमेरे लावून जोडप्यांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्डिंग; पोलिसांकडून टोळीला अटक)
वृत्तानुसार, 20 ऑक्टोबर रोजी पीडितेच्या वडिलांनी कुवाडवा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुलाने दोन दिवसांपूर्वी आपल्या बहिणीला घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली होती. त्यानंतर बहिणीने त्यांच्या वडिलांना ही माहिती दिली. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य मुलाला भेटण्यासाठी वसतिगृहात पोहोचले, तिथे त्याने याबाबत सविस्तर माहिती दिली. तक्रारीनंतर पीडित मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.