गुजरात: मंदिरात शिरलेल्या मगरीची भाविकांकडून पूजा, वनाधिकाऱ्यांनी केली सुटका
मात्र त्या मंदिरात येणाऱ्या भाविकांनी मगरीला न घाबरता तिची पूजा करण्यास सुरुवात केली.
गुजरात (Gujrat) येथील एका मंदिरात मगरीने प्रवेश केला. मात्र त्या मंदिरात येणाऱ्या भाविकांनी मगरीला न घाबरता तिची पूजा करण्यास सुरुवात केली. मात्र वनाधिकाऱ्यांनी मगरीची मंदिरातून सुटका केली आहे.
पटेल समाज खोडियार माता हिला आपली कुलदेवता मानतात. या समाजाच्या मतानुसार येथील देवीचे वाहन हे मगर आहे असे मानले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, येथील मंदिरात एका दिवसापूर्वी चोरी झाली होती आणि दुसऱ्या दिवशी पुजारी मंदिरात आले असता त्यांना देवीच्या येथे मगर असलेली आढळून आली. त्यामुळे त्यांनी देवीचे रुप मानून तिची पूजा करण्यास सुरुवात केली.
मात्र वनाधिकाऱ्यांच्या मते जवळच असलेल्या एका तळ्यातील मगर खाण्याच्या शोधात मंदिराच्या येथे येऊन पोहलची होती. परंतु भाविकांनी त्या मगरीला टिका आणि सिंदूर लावून पूजा करत होते. तसेच मगरीची पुजा करण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दीसुद्धा केली होती. याबद्दल वनाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु मंदिरातील भाविकांनी वनाधिकाऱ्यांच्या तेथील उपस्थितीवर विरोध दर्शवण्यास सुरुवात केली.. मात्र अखेर मगरीची मंदिरातून सुटका करत पुन्हा एकदा तळ्यात सोडण्यात आले.