GST Evasion: देशात यंदा 2.01 लाख कोटी रुपयांची जीएसटी चोरी उघड; मुंबई अव्वल, ऑनलाइन गेमिंग सेक्टरमधून सर्वाधिक प्रकरणे

यामध्ये मुंबई झोनमधून 70,985 कोटी रुपयांची जीएसटी चोरी उघडकीस आली आहे.

GST PTI

देशात वस्तू आणि सेवा कर (GST) लागू झाल्यानंतर कर चुकवणे इतके सोपे राहिलेले नाही. असे असूनही, लोक जीएसटी टाळण्याचा काही ना काही मार्ग शोधतात. जीएसटी इंटेलिजन्स डायरेक्टोरेट जनरल (DGGI) अशा जीएसटी चुकवणाऱ्या लोकांना अटक करण्यासाठी सतत काम करत आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी डीजीजीआय अहवालानुसार, त्यांनी देशात 2.01 लाख कोटी रुपयांची जीएसटी चोरी उघड केली आहे. यामध्ये सेंट्रल जीएसटी झोनने पकडलेली रक्कम जोडली तर हा आकडा 2/37 लाख कोटी रुपयांवर पोहोचतो. देशात सर्वाधिक जीएसटी चोरीचे गुन्हे मुंबईत उघडकीस आले आहेत.

जीएसटी इंटेलिजन्स अहवालानुसार, डीजीजीआय (जीएसटी इंटेलिजन्सचे महासंचालक) आणि सेंट्रल जीएसटी झोन ​​यांनी मिळून 20,576 करचुकवेगिरीची प्रकरणे उघड केली आहेत. यामध्ये मुंबई झोनमधून 70,985 कोटी रुपयांची जीएसटी चोरी उघडकीस आली आहे. यानंतर दिल्लीत 18,313 कोटी रुपये, पुण्यात 17,328 कोटी रुपये, गुरुग्राममध्ये 15,502 कोटी रुपये आणि हैदराबादमध्ये 11,081 कोटी रुपयांची करचोरी आढळून आली आहे.

2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर करचुकवेगिरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अहवालानुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात जीएसटी इंटेलिजन्सद्वारे 1.01 लाख कोटी रुपयांची करचोरी आढळून आली. आता एकाच आर्थिक वर्षात हा आकडा जवळपास दुप्पट झाला आहे. यंदाची सुमारे 46 टक्के जीएसटी चोरीची प्रकरणे कर न भरल्यामुळे, 20 टक्के बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटमुळे आणि 19 टक्के चुकीच्या मार्गाने लाभ घेतल्यामुळे आहेत. (हेही वाचा: UPI Transaction Limit Increased: आजपासून वाढली युपीआय ​​व्यवहार मर्यादा; जाणून घ्या एका दिवसात किती पैसे ट्रान्सफर होणार)

जीएसटी चोरीबाबत 2017-18 या आर्थिक वर्षात हा आकडा 7,879 कोटी रुपये, 2018-19 मध्ये 19,319 कोटी रुपये, 2019-20 मध्ये 21,739 कोटी रुपये, 2020-21 मध्ये 31,908 कोटी रुपये आणि 2021-2021 मध्ये 50,325 कोटी रुपये होता. जीएसटी इंटेलिजन्सनुसार, ऑनलाइन गेमिंग, बँकिंग, वित्तीय सेवा, विमा क्षेत्र, लोखंड, तांबे, भंगार आणि मिश्रधातूमध्ये मोठ्या प्रमाणावर करचोरी केली जात आहे.  अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात ऑनलाइन गेमिंग क्षेत्रात सर्वाधिक 81.875 कोटी रुपयांची जीएसटी चोरी झाल्याचे आढळून आले. याशिवाय पान मसाला, तंबाखू, सिगारेट, विडी, प्लायवूड, लाकूड, कागद, इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगमरवरी, ग्रॅनाइट आणि टाइल्समध्येही कोट्यवधी रुपयांची जीएसटी चोरी उघडकीस आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif