Coronavirus Lockdown: औषधं आणि जीवनावश्यक वस्तू यांची घरपोच सेवा देण्याला सरकारची मंजुरी
मात्र वाहतुकीवर बंधनं घालण्यात आल्याने घरपोच डिलेव्हरी देण्यासाठी अडथळा येत होता.
कोरोना व्हायरस विरूद्धची लढाई लढताना जनसामान्यांना जीवघेण्या कोव्हिड 19 आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी देशात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. मात्र याकाळात काही अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान या लॉकडाऊनच्या काळात औषध, जीवनावश्यक ड्रग्ज आणि काही किराणामाल, दूध, भाजीपाला यांची घरपोच सेवा देणार्या संस्थाना आता Doorstep Service साठी परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान लॉकडाऊन जाहीर करतानाच फार्मसी, हॉस्पिटल, वैद्यकीय दवाखाने, किराणामालाची दुकानं, भाजीपाल्याची दुकानं वगळण्यात आली आहेत. मात्र वाहतुकीवर बंधनं घालण्यात आल्याने घरपोच डिलेव्हरी देण्यासाठी अडथळा येत होता. मात्र आता मुंबई शहरामध्ये नजिकच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन संबंधित कार्ड बनवून घेऊन होम डिलेव्हरीची सोय पुन्हा सुरू करता येऊ शकते. Coronavirus Lockdown: भारत देशात लॉकडाऊनच्या काळात Flipkart देणार नागरिकांना किराणामालाची घरपोच सेवा.
कोव्हिड 19 चा सामना करण्यासाठी आपल्याकडे केवळ social-distancing हा एक पर्याय आहे. कोरोना व्हायरस संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील 3 आठवडे लोकांनी घरीच बसा आणि सरकारला मदत करा असे आवाहन विविध माध्यमातून केलं जातं आहे.
मुंबई पोलिस ट्वीट
महाराष्ट्रामध्ये सध्य कोरोनाग्रस्तांचा आकडा 125 झाला आहे. तर देशामध्ये 649 पर्यंत पोहचला आहे. मागील 24 तासामध्ये भारतामध्ये 42 नवे रूग्ण आढळले असून त्यांच्यावर सरकारी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.