Unlock 1 Guidelines: कटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊनमध्ये 30 जूनपर्यंत वाढ; केंद्र सरकारकडून कंन्टेंटमेंट झोन वगळता कोणती कामे सुरु होणार यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सुचना जारी
तसेच केंद्र सरकारकडून कन्टेंटमेंट झोन वगळता कोणती कामे सुरु होणार यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता देशभरात रात्री 9 ते 5 या दरम्यान नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.
Unlock1 Guidelines: कोरोना व्हारसच्या पार्श्वभूमीवर देशातील कटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊनमध्ये 30 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारकडून कन्टेंटमेंट झोन वगळता कोणती कामे सुरु होणार यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता देशभरात रात्री 9 ते 5 या दरम्यान नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊन 5.0 साठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या लॉकडाऊनमध्ये देशातील कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या ठिकाणांना टप्प्याटप्प्याने सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेली ही नियमावली 1 जून ते 30 जूनपर्यंत लागू असणार आहे. लॉकडाऊन 5.0 हे तीन टप्प्यांच असणार आहे. यात 8 जूनपासून टप्प्याटप्याने धार्मिक स्थळं, हॉटेल्स आणि मॉल सुरू होणार आहेत. (वाचा - येत्या 2 दिवसात विद्यापीठ परीक्षांबाबत निर्णय घेण्यात येणार- उच्च शिक्षणमंत्री व तंत्रमंत्री उदय सामंत; 30 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
लॉकडाऊन 5.0 मार्गदर्शक सुचना -
पहिला टप्पा: 8 जूनपासून धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट्स, शॉपिंग मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात येणार. सरकार यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यार आहे.
दुसरा टप्पा: शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक / प्रशिक्षण / प्रशिक्षण संस्था इ. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सल्लामसलतानंतर उघडणार
तिसरा टप्पा: आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास सुरू करण्याच्या तारखा, मेट्रो रेल्वेचे काम, सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्याने इत्यादी संदर्भात आकलनाच्या आधारे निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन मार्गदर्शक सुचना 1 जून 2020 पासून अंमलात येणार असून त्या 30 जून 2020 पर्यंत लागू असणार आहेत.