Gorakhpur Triple Talaq Case: गोरखपूरमध्ये महिलेला फोनवरून ट्रिपल तलाक, आत्महत्या प्रकरणात पोलीस अधिकारी निलंबित

Gorakhpur Woman Suicide: उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी होत असलेल्या त्रासामुळे एका महिलेने आत्महत्या केली. फोनवर पतीने ट्रिपल तलाक दिल्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निलंबित करण्यात आला आहे.

Triple Talaq | (Photo credit: archived, edited, representative image)

Triple Talaq India News: उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर येथे (Gorakhpur Suicide News) एका महिलेला तिच्या पतीने फोनवरून ट्रिपल तलाक (Triple Talaq Case 2025) दिल्यानंतर तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही महिला सासरकडून वारंवार होणाऱ्या हुंड्याच्या छळामुळे ( Dowry Harassment India) मानसिकदृष्ट्या त्रस्त होती. या प्रकरणात पीडितेच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित (Cop Suspended Dowry Complaint) करण्यात आले आहे.

मृत महिलेचं नाव सानिया असून ती 26 एप्रील रोजी गोरखपूरमधील माहेरी परतली होती. सोमवारी सायंकाळी तिचा पती सालाउद्दीन याने महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रसायनी येथून तिला फोन करून ट्रिपल तलाक दिला. त्यानंतर तिने आत्महत्या केली. (हेही वाचा, Thane Triple Talaq Case: एकटीच फिरायला गेली पत्नी; चिडलेल्या पतीने दिला ट्रिपल तलाक, ठाण्यातील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल)

तक्रारीकडे दुर्लक्ष, पोलीस अधिकारी निलंबित

वरिष्ठ पोलीस अधीक्षक गौरव ग्रोव्हर यांनी चौरी चौरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जयप्रकाश सिंग यांना निलंबित केलं आहे. सानियाच्या आईने यापूर्वी सासरच्या लोकांविरुद्ध हुंडाबळीची तक्रार दिली होती. मात्र, उपनिरीक्षकाने ती नोंदवून न घेतल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. (हेही वाचा: युपी: मुलगी जन्माला आली म्हणून नवऱ्याने बायकोला तिहेरी तलाक देत रस्त्यावर सोडून काढला पळ)

उत्तर परिक्षेत्राचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जितेंद्रकुमार श्रीवास्तव यांच्या अंतर्गत झालेल्या चौकशीत हे स्पष्ट झाले की, सानिया व तिची आई पोलीस ठाण्यात आल्या होत्या, पण एफआयआर दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल

या प्रकरणात खालील आठ जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आली आहे:

नाव सानियाशी नातं
सालाउद्दीन पती
सायरा सासू
आसिया जाऊ
खुशबू जाऊ
रोजी जाऊ
झिया-उल-उद्दीन दीर
बाला-उद्दीन दीर
अज्ञात इतर आरोपी (असल्यास)

एफआयआरमध्ये नमूद केलं आहे की सालाउद्दीनने फोनवरून सानियाला ट्रिपल तलाक दिला आणि तिच्याशी वाद घातला. यामुळे मानसिक तणावात असलेल्या सानियाने त्याच रात्री आत्महत्या केली.

लग्नानंतर सातत्याने होत होता छळ

सानियाच्या आई आसिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सानियाचं लग्न 7ऑगस्ट 2023 रोजी सालाउद्दीनसोबत झालं होतं. लग्नात सासरच्या मागणीनुसार हुंडा देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर लगेचच सानिया पती व सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रासाला सामोरी जात होती.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पीडित कुटुंबाने अनेकदा हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, पण छळ थांबला नाही. एकदा सालाउद्दीनने सानियासाठी वेगळी व्यवस्था केली, पण नंतर तिला सोडून दिलं. त्यामुळे ती पुन्हा गोरखपूरमधील माहेरी परतली. सानिया केवळ तिच्या लहान बहिणीच्या फोनवरूनच संपर्कात होती.

प्रकरणाची सखोल चौकशी सुरू

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून सर्व पुरावे तपासण्यात येत आहेत. या घटनेमुळे देशातील ट्रिपल तलाक कायदा आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांची अंमलबजावणी, तसेच पोलीस यंत्रणेची जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक:

टेली मानस (आरोग्य मंत्रालय): 14416 किंवा 1800 891 4416; निमहंस: + ९१ + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; पीक माइंड: 080-456 87786; वांद्रेवाला फाउंडेशन: – 9999 666 555; अर्पिता आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन: 080-23655557; आयकॉल: 022-25521111 आणि 9152987821 आणि 9152987821; सीओओजे मेंटल हेल्थ फाउंडेशन (सीओओजे): 0832-2252525.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement