Gold Rate Today: धनतेरस पूर्वी आज सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 52,404 तर चांदीसाठी एका किलोचे दर 66,309 वर पोहचले
Gold Rate Today: सणासुदीचे दिवस जवळ आले असून सोन्याचांदीच्या दरात वाढ झाल्याचे आज दिसून आले आहे. तर MCX वर सोन्याचे दर 0.45 टक्के म्हणजेच प्रति 10 ग्रॅमसाठी 52,404 रुपये झाले आहेत. तर चांदीचे दर 1.5 टक्क्यांनी वाढल्याने ग्राहकांना खरेदीसाठी प्रति किलोसाठी 66,309 रुपये मोजावे लागणार आहेत. याबद्दल Livemin रिपोर्ट यांनी ही माहिती दिली आहे. तर धनतेरस सारख्या शुभमुहूर्तावर सोन्याची आणि चांदीची बहुतांश नागरिकांकडून केली जाते.(अबब! प्रतितोळा 38 हजार 470 रुपये; सर्वसामान्यांनी सोनं घ्यायचं की नुसतंच पाहायचं? चांदीही महागली)
गेल्या पाच दिवसात सोन्याचे दर 1500 रुपयांनी वाढल्याचे दिसून आले आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदींचे दर 4 हजार रुपये प्रति किलो झाले. तर ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर तर तब्बल प्रति 10 ग्रॅमसाठी 56,200 रुपयांपर्यंत पोहचले होते.(Sovereign Gold Bond Scheme: दिवाळी, धनतेरसच्या पार्श्वभूमीवर स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी; आजपासून सरकार सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीमच्या 8 व्या सीरीजला सुरूवात)