Gold Price on Budget Day: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर

यंदाचे बजेट अधिक महत्वपूर्ण असून कोरोनाची परिस्थिती पाहता काय तरतूदी केल्या जातील याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याच पार्श्वभुमीवर आजच्या अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याचे दर वाढल्याचे दिसून आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

Gold Price on Budget Day:  आज केंद्र सरकारचे बजेट 2021-22 लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहे. यंदाचे बजेट अधिक महत्वपूर्ण असून कोरोनाची परिस्थिती पाहता काय तरतूदी केल्या जातील याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याच पार्श्वभुमीवर आजच्या अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याचे दर वाढल्याचे दिसून आहे. गेल्या महिन्यात सोन्यात 2 टक्क्यांनी घट झाली होती. एमसीएक्सवर गोल्ड फ्युचर्स 0.5 टक्के वाढण्यासह 49,566 वर प्रति ग्रॅम झाले आहे. त्याचसोबत चांदीचे दर ही वाढल्याचे दिसून आले आहे. एमसीएक्स वर चांदीचे दर 6 टक्क्यांनी वाढून 74.000 रुपये प्रति किलो ग्रॅम झाले आहेत.(Share Market: केंद्राचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर मार्केटमध्ये तेजी, सेनसेक्स 406 अंकानी खुलला)

प्रत्येक महिन्यांच्या आधारावर पाहिले असता जानेवारी महिन्यात सोन्याच्या किंमतीत जवळजवळ 2 टक्के म्हणजेच 1000 रुपये प्रति ग्रॅम घट झाल्याचे दिसले आहे. ग्लोबल मार्केटवर नजर टाकल्यास कळते की, सोन्याच्या सध्याचा दर 0.3 टक्क्यांनी वाढून 1852.35 डॉलर प्रति Ounce वर गेला आहे. तर चांदीचे दर सुद्धा 7.4 टक्क्यांनी वाढला आहे. हा दर गेल्या सहा महिन्यांहून अधिक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे सध्याचे दर ऑगस्ट नंतर सर्वाधिक झाला असून तो 28.98 डॉलर प्रति Ounce जवळवर आला आहे.

याच दरम्यान, भारत सरकारचे Sovereign Gold Bond Scheme 2020-21 च्या सीरिज XI सब्सक्रिप्शनसाठी आजपासून सुरुवात झाली असून तो 5 फेब्रुवारीला बंद होणार आहे. याची किंमत 4912 रुपये प्रति ग्रॅम ठरवली गेली आहे. डिजिटल पद्धतीने खरेदी आणि पेमेंट करणाऱ्यांना 50 रुपये प्रति महिना डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे.(Union Budget 2021 Live Updates In Marathi: केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 लोकसभेत मांडण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरूवात)

Geojit च्या एका अॅनालिस्ट यांनी असे म्हटले आहे की, 2021 मध्ये सोन्याचे दर स्थिर असणार आहेत. तसेच दरात चढउतार होण्याची अपेक्षा नाही आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सादर करणाऱ्या अर्थसंकल्पात गोल्ड ड्युटीबद्दल काय घोषणा करणार याकडे लक्ष असणार आहे. दरम्यान. भारतात सोन्याच्या किंमतीवर 12.5 आयात कर आणि 3 टक्के जीएसटीचा समावेश आहे.