भारतीय चलनाची स्थिती सुधारण्यासाठी नोटांवर देवी लक्ष्मी चा फोटो छापा- सुब्रमण्यम स्वामी

सुब्रण्यम स्वामी यांचे मध्य प्रदेशातील खंडवामध्ये भाषण झाले. लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार, स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला या विषयावर त्यांचे भाषण झाल्यानंतर पत्रकारांशी बातचीत करत असताना त्यांनी हे वक्तव्य केले.

Subramanian Swamy (Photo Credits: PTI and Pixabay)

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या होणा-या घसरणीबाबत भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रण्यम स्वामी यांनी एक अजब वक्तव्य केले आहे. "भारतीय चलनाची स्थिती सुधारायची असेल नोटांवर देवी लक्ष्मीचा फोटो छापा" असे अजब वक्तव्य सुब्रण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी केले आहे. सुब्रण्यम स्वामी यांचे मध्य प्रदेशातील खंडवामध्ये भाषण झाले. लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार, स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला या विषयावर त्यांचे भाषण झाल्यानंतर पत्रकारांशी बातचीत करत असताना त्यांनी हे वक्तव्य केले.

पत्रकारांशी बोलत असताना पत्रकारांनी सुब्रण्यम स्वामी यांचे इंडोनेशियाच्या चलनावर श्रीगणेशाचे छायाचित्र असल्याचे सांगितले. त्यावर उत्तर देताना "या प्रश्‍नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच देऊ शकतात. माझे यासाठी समर्थन आहे. भगवान गणेश विघ्नहर्ता आहेत. मी तर असे म्हणेन की भारतीय चलनाची स्थिती सुधारण्यासाठी आपल्या नोटांवर देवी लक्ष्मीचे छायाचित्र छापले जावे. कोणालाही याबद्दल वाईट वाटू नये" असे सुब्रण्यम स्वामी म्हणाले.

US-Iran तणावाचे परिणाम शेअर बाजारावर; सेन्सेक्स, निफ्टी कोसळला तर डॉलरच्या तुलनेत रूपया 72.08 वर

अलीकडेच अमेरिका आणि ईराण या देशांमधील सध्याच्या तणावग्रस्त संबंधांचा परिणाम आता भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. 6 जानेवारीला शेअर बाजार उघडताच सेंसेक्स अअणि निफ्टी दोन्ही कोसळल्याचं चित्र दिसले. सध्या चाळीशीपार गेलेला सेन्सेक्स 366 अंकांनी कोसळला तर निफ्टी मध्येही 150 अंकांची पडझड पहायला मिळाली . आज सेन्सेक्स 41,097.69 वर पोहचला आहे.

बगदाद हल्ल्यानंतर जगभरात त्याचे पडसाद पहायला मिळाले आहेत. दरम्यान याचा परिणाम सोन्याच्या भावांवर देखील होणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. तर भारताचा रूपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 72.08 वर पोहचला आहे.