Goa First COVID19 Death: गोव्यात कोरोनामुळे पहिला बळी, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती
याबबात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी माहिती दिली आहे.
गोव्यात (Goa) कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) पहिला बळी गेल्याची घटना समोर आली आहे. याबबात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी माहिती दिली आहे. सदर कोरोनाग्रस्त महिला 85 वर्षीय असून मोर्लेम येथे राहणारी होती. या वृद्ध महिलेला अस्थमा, मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे. या महिलेचे आज सकाळी निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे.(Coronavirus Update in India: भारतात 14,821 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 4,25,282 वर)
गोव्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आतापर्यंत गोव्यात एकूण 625 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 129 जणांची प्रकृती सुधारली आहे. मात्र आता गोव्यात कोरोनामुळे पहिलाच बळी गेला आहे. सध्या कोरोनाच्या परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ही आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.(Satyendar Jain Health Updates: दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचा प्लाझ्मा थेरपीला सकारात्मक प्रतिसाद; प्रकृतीमध्ये सुधारणा)
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे दिवसागणिक कोरोनाग्रस्तांसह बळींचा आकडा वाढत चालला आहे. देशातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत बोलायचे झाल्यास आकडा 425282 वर पोहचला आहे. तर 13699 जणांचा बळी गेला असून अद्याप 174387 जणांवर अद्याप उपचार सुरु असून 237196 जणांची प्रकृती सुधारली आहे. दरम्यान, देशात येत्या 30 जून पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुढे लॉकडाऊन ऐवजी गोष्टी अनलॉक करण्याकडे लक्ष दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.