क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोट्याशा असलेल्या गोवा (Goa Assembly Elections 2022) राज्यात भाजपने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळेल अशी चर्चा होती. काही प्रमाणात अशी टक्कर झालीही. निर्णायक लढाईत मात्र भाजपने बाजी मारली. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार गोव्यात भाजपने 20 ठिकाणी विजय मिळवला आहे. तर काँग्रेसने 12 जागा मिळवल्या आहेत. पंजाबसोबतच आम आदमी पक्षाने गोव्यातही आपले खाते खोलले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची यादी आणि काही महत्त्वाच्या लढती येथे देत आहोत.
प्रमोद सावंत विरुद्ध धर्मेश सगलानी
साखळी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री प्रमोद सावंत विजयी झाले आहेत. या जागेवर काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांनी त्यांना टक्कर दिली. अखेर प्रमोद सावंत यांचा 666 मतांनी विजय झाला. (हेही वाचा, GOA Election Results 2022: गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीला 'नोटा'पेक्षाही कमी मते, भाजपने उडवली खिल्ली)
अतानासियो मोनसेरेट विरुद्ध उत्पल पर्रिकर
गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांचा भाजप उमेदवार अतानासियो मोनसेरेट यांनी पराभव केला आहे. उत्पल यांना 5857 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असलेल्या अतानासियो मोनसेरेट यांना 6531 मते मिळाली.
विजयी उमेदवारांची यादी
- आतापर्यंत गोव्यात विजयी झालेले उमेदवार (Goa Winners Complete list )
- डीलायल लोबो (शिवोली मतदारसंघ)- विजयी (BJP)
- दाजी साळकर (वास्को मतदारसंघ) - विजयी (BJP)
- रवी नाईक (फोंडा मतदारसंघ) - विजयी (BJP)
- विरेश बोरकर ((St. Andre) मतदारसंघ) - विजयी (Revolutionary Goans Party)
- अँथनी वाझ (कुठ्ठाळी मतदारसंघ) - विजयी
- जीत आरोलकर (मांद्रे मतदारसंघ) - विजयी
- मॉविन गुदिन्हो (दाबोळी मतदारसंघ) - विजयी (BJP)
- उल्हास तुयेकर (नावेली मतदारसंघ) - विजयी (BJP)
- निलेश काब्राल (कुडचडे मतदारसंघ) - विजयी (BJP)
- सुभाष फळदेसाई ( सांगे मतदारसंघ) - विजयी (BJP)
- व्हेन्झी व्हिएगास (बाणावली मतदारसंघ) - विजयी
- प्रविण आर्लेकर (पेडणे मतदारसंघ) - विजयी
- विश्वजीत राणे (वाळपाई मतदारसंघ) - विजयी
- दिव्या राणे (पर्ये मतदारसंघ) - विजयी
- बाबूश मोन्सेरात (पणजी मतदारसंघ) - विजयी
- जेनिफिर मोन्सेरा ( ताळगाव मतदारसंघ) - विजयी
- गोविंद गावडे ( प्रियोळ मतदारसंघ) - विजयी (BJP)
- गोवा फॉरवर्ड सरदेसाई (फातोर्डा मतदारसंघ) - विजयी
- अपक्ष चंद्रकांत शेट्ये (डिचोली मतदारसंघ) - विजयी
- संकल्प आमोणकर (मुरगाव मतदारसंघ) - विजयी
- गणेश गावकर (सावर्डे मतदारसंघ) - विजयी (BJP)
- उल्हास तुयेकर (नावेली मतदारसंघ) - विजयी (BJP)
- दिगंबर कामत (मडगाव मतदारसंघ) - विजयी (Congress)
- अॅल्टन डिकॉस्ता ( केपे मतदारसंघ) - विजयी (Congress)
डॉ. प्रमोद सावंत (साखळी मतदारसंघ) - विजयी (BJP)
दरम्यान, अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभांसाठी झालेल्या निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. प्रदीर्घ काळ प्रचार आणि विविध टप्प्यांमध्ये हे मतदान पार पडले. या मतदानाबाबत निर्माण झालेली उत्सुकता आज संपणार आहे. आज सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणी पोस्टल बॅलेट मतांपासून सुरु झालेल्या मतमोजणीनंतर आता ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरु आहे. उत्तर प्रदेशसाठी 403, पंजाब- 117, उत्तराखंड- 70 आणि गोव्यासाठी 40 जागांसाठी या ठिकाणी मतदान झाले. मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद केले. आज या उमेदवारांबाबत जनतेच्या मनात काय आहे हे स्पष्ट होत आहे.