भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधार, GDP ची Q3 मध्ये 4.7% वर मजल
2019-20 च्या Q3 मध्ये जीडीपी (2011-12) ची किंमत 36.65 लाख कोटी रुपये इतकी होती. तर 2018-19च्या तिमाहीत ती 35.00 लाख कोटी रुपये होती. या थोड्याशा वाढीव जीडीपीमुळे सरकारला खूप दिलासा मिळणार आहे.
मोदी सरकारसाठी आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आणि दिलासादायक असा आहे. कारण देशाच्या आर्थिक विकास दरात सुधारणा झाल्याचे चित्र समोर आले आहे. सध्याच्या आकड्यानुसार, GDP चालू अर्थसंकल्पीय वर्षाच्या तिमाहीत वाढून 4.7% झाली आहे. याआधी दुस-या तिमाहीत GDP दर हा 4.5% होता. यामुळे केंद्र सरकारांना अनेक समस्येला सामोरे जावे लागत होते. आता हा दर वाढल्यामुळे केंद्र सरकारच्या डोक्यावरची टांगती अर्थव्यवस्थेची तलवार कमी होईल असे म्हणायला हरकत नाही.
सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चालू अर्थसंकल्पीय वर्षाच्या तिमाहीत GDP उत्पादन वाढूल 4.7% झाली आहे. 2019-20 च्या Q3 मध्ये जीडीपी (2011-12) ची किंमत 36.65 लाख कोटी रुपये इतकी होती. तर 2018-19च्या तिमाहीत ती 35.00 लाख कोटी रुपये होती. या थोड्याशा वाढीव जीडीपीमुळे सरकारला खूप दिलासा मिळणार आहे.
ANI चे ट्विट:
हेदेखील वाचा- GDP मोजण्याच्या पद्धतीत RBI बदल करण्याची शक्यता; नव्या 12 मानकांनी कळणार अर्थव्यवस्थेची स्थिती
यामुळे मंदीचा सामना करणा-या उद्योग जगताला थोडा दिलासा मिळणार आहे. असे सांगण्यात येत आहेत की, विमान प्रवास, रेल्वे भाडे आणि वाहनांची विक्रीत नफा झाल्याने GDP मध्ये ही वाढ झाली आहे. तसे पाहता वर्षाच्या तिमाहीत पहिल्या आणि दुसरीच्या तुलनेत जास्त मजबूत असतो.
सप्टेंबर 2019 च्या दुस-या तिमाहीत म्हणजेच Q2 मध्ये 4.5 टक्के इतकी झाली होती. ती सलग 5व्या तिमाहीतील घट होती. तसेच 6 सर्वात कमी वाढ होती.