Bharat Ratna 2019: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना आज प्रदान होणार 'भारत रत्न' पुरस्कार

भारत देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारत रत्न'(Bharat Ratna) हा यंदा माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee), नानाजी देशमुख (Nanaji Deshmukh) आणि भूपेन हजारिका (Bhupen Hazarika) यांना जाहीर करण्यात आला आहे.

Bharat Ratna 2019: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना आज प्रदान होणार 'भारत रत्न' पुरस्कार
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Photo Credits- Twitter)

भारत देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारत रत्न'(Bharat Ratna) हा यंदा माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee), नानाजी देशमुख (Nanaji Deshmukh) आणि भूपेन हजारिका (Bhupen Hazarika) यांना जाहीर करण्यात आला आहे. जानेवारी 2019 मध्ये घोषणा करण्यात आलेल्या या पुरस्काराचा आज प्रदान सोहळा पार पडणार आहे. कॉंग्रेस नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणब  मुखर्जी यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर कारण्यात आला आहे. भुपेन हजारिका यांच्या कुटुंबियांचा 'भारतरत्न' स्विकारण्यास नकार

यंदाचे भारतरत्न पुरस्काराचे मानकरी कोण?

प्रणब मुखर्जी

प्रणब मुखर्जी हे भारताचे 13 वे राष्ट्रपती आहेत. राष्ट्रीय राजकारणात ते 1969 पासून सक्रिय आहेत. मुखर्जी यांनी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट मंत्रीपद भूषवले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी काँग्रेस पक्षामधून राजीनामा दिला.

आज त्यांच्या कार्याचा गौरव 'भारत रत्न' या पुरस्काराने होणार आहे.

नानजी देशमुख

नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. पुणे विद्यापीठाने त्यांचा गौरव ’डॉक्टर ऑफ लेटर्स’या पदवीने केला आहे. फेब्रुवारी 2010 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर आता भारतरत्न या मरणोत्तर पुरस्काराने त्यांचा गौरव केला जाणार आहे.

भूपेन हजारिका

डॉ. भूपेन हजारिका हे प्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार, वादक होते. आसामी प्रमाणेच हिंदी आणि बंगाली चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ भारत रत्न जाहीर करण्यात आला आहे.

1955 नंतर भारतामध्ये मरणोत्तर भारत रत्न देण्याची प्रथा सुरू झाली आहे. भूपेन हजारिकाच्या कुटुंबियांनी भारतरत्न स्वीकारण्यास नकार दिल्याने चर्चा रंगल्या होत्या.

(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2019 10:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).