पहिल्यांदा हरयाणा येथे सापडले हडप्पाकालीन प्रेमी युगलाचे सापळे

तर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात हे प्रेमी युगलाचे थडगे सापडले आहेत.

हडप्पाकालीन प्रेमी युगल अवशेष (फोटो सौजन्य- ट्वीटर)

हरयाणा येथील राखीगढीमध्ये उत्खननात हडप्पाकालीन प्रेमी युगलाचे अवशेष सापडले आहेत. तर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात हे प्रेमी युगलाचे थडगे सापडले आहेत. तर पहिल्यांदाच उत्खननात प्रेमी युगलाचे थडगे सापडले आहेत.

उत्खननात सापडलेल्या प्रेमी युगलाला तरुणपणी गाडल्याचे संशोधकांचे म्हणणे कआहे. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय मॅगझिन एसीबी जर्नल ऑफ अॅनोटोनी अॅण्ड सेल बायोलॉजी मध्ये लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. यापूर्वीही लोथल येथे हडप्पा संस्कृतीशी निगडीत एक विधवा महिलेचे थडगे सापडले होते.

पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरात्व विभाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ पऑरेंसिक सायन्स, सोल नॅशनल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसीन यांनी सापडलेल्या हडप्पाकालीन प्रेमी युगलाचे विश्लेषण केले आहे. तर संधोशकांनी या युगलाचे वय 21 ते 35 वर्ष असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच यांच्या थडग्याजवळ मातीची भांडी आणि धातूचा हार मिळाला आहे.