Coronavirus: तबलीगी जमातीच्या लोकांचा किळसवाणा प्रकार; क्वॉरंटाइन सेंटरमधील खोलीबाहेर केली विष्ठा, FIR दाखल
तर, दुसरीकडे रुग्णालये आणि विलगीकरण केंद्रामध्येही त्यांच्या गैरवर्तनाच्या बाबतीतही दिवसेंदिवस वाढ होत आहे.
एकीकडे तबलीगी जमातमुळे (Tablighi Jamaat) देशभरात कोरोना व्हायरसची (Coronavirus) प्रकरणे वाढत आहेत. तर, दुसरीकडे रुग्णालये आणि विलगीकरण केंद्रामध्येही त्यांच्या गैरवर्तनाच्या बाबतीतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. उपचार करून न घेणे आणि परिचारिकांशी गैरवर्तन केल्यानंतर आता या जमातीमधील लोकांनी नरेला (Narela) येथील हॉस्पिटलमध्येच एक किळसवाणे कृत्य केले आहे. तर आता या लोकांनी विलगीकरण सेंटरमधील (Quarantine Center) रूम बाहेरच विष्ठा केल्याचे निदर्शनास आले आहे. केंद्रातील सफाई कामगाराने याबाबत माहिती दिली. ही घटना नरेलाच्या क्वॉरंटाइन सेंटरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर जमातीविरोधात एफआयए नोंदविण्यात आला आहे.
पोलिस एफआयआरनुसार ही घटना 4 एप्रिलची आहे. ज्या खोलीबाहेर ही गोष्ट घडली आहे त्या खोलीमधील दोघांविरोधात ही तक्रार नोंदवली आहे. हे दोघे तबलीगी जमातच्या दिल्ली कार्यक्रमात उपस्थित होते. या केंद्राच्या व्यवस्थापकांनी नोंदवलेल्या एफआयएमध्ये असे म्हटले आहे की, ‘सेंटरमधील वॉर्डाजवळ साफसफाई करताना खोली क्रमांक 212 च्या बाहेर कोणीतरी विष्ठा केल्याचे आढळले.’ या खोलीत मोहम्मद फहाद आणि अदनान झहीर यांना ठेवण्यात आले आहे. याच दोघांनी हे काम केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे, कोरोना विषाणूचा फैलाव होण्याचा धोका वाढला आहे, ज्यामुळे येथे असलेल्या इतरांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. (हेही वाचा: भारताने सर्व राष्ट्रांना मदत करावी, मात्र प्राण वाचवणारी औषधे प्रथम भारतीयांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत; राहुल गांधी)
एफआयआरनुसार हे दोघेही उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. भारतीय लष्कर आता नरेलाच्या क्वॉरंटाइन शिबिराची धुरा सांभाळत आहे. हे पहिले आयसोलेशन शिबिर आहे, जेथे सैन्याच्या डॉक्टरांची मदत घेतली गेली आहे. नरेला कॅम्पमध्ये 1200 हून अधिक कोरोना संशयितांना ठेवले आहे. दिल्लीतील निजामुद्दीन मरकजचे अनेक लोकही इथे आहेत. दरम्यान, गाझियाबादमधील सरकारी रूग्णालयात दाखल केलेल्या काही जमातीमधील लोकांवरही, रुग्णालयाच्या परिचारिका व इतर कर्मचार्यांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार देऊन प्रशासनाला कारवाई करण्याची विनंती केली आहे.