Budget 2019: निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पातील 159 वर्ष जूनी परंपरा मोडली, लेदर बॅग ऐवजी लाल कपड्यातून आणली कागदपत्रं; आर्थिक सल्लागार के. सुब्रम्हणम यांनी केला 'खास' खुलासा
लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार्या निर्मला सीतारमण या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.
आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Nirmala Sitharaman )पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत. लोकसभेत 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री सीतारमण यांच्यासोबत अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आणि सरकारी अधिकारी अर्थमंत्र्यालयात दाखल झाले आहेत. मात्र दरवर्षी लाल लेदर बॅगेतून आणला जाणारा अर्थसंकल्प यंदा लाल वस्त्रात गुंडाळून आणला आहे. त्यावर राजमुद्रा लावण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण बदल अनेकांच्या चटकन लक्षात आहे. यावर आर्थिक सल्लागार के. सुब्रम्हणम यांनी खुलासा करत 'पाश्चिमात्य विचारसरणीच्या गुलामी'तून मुक्ततेचं हे पाऊल असल्याचं म्हटले आहे.भारताचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी तो लाल रंगाच्या लेदर बॅग मधूनच आणण्यामागे आहे 159 वर्ष जूनी कहाणी, कशी सुरू झाली ही प्रथा?
निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प चार घड्या असलेल्या लाल वस्त्रामध्ये गुंडाळून आणला आहे. ब्रिटीश संस्कृतीनुसार भारतानेही आत्तापर्यंत लाल रंगाची ब्रिफ केसमधून दस्तावेज आणण्याची प्रथा कायम ठेवली होती. मात्र आता या पाश्चिमात्य विचारसरणीतून बाहेत पडत आपल्या संस्कृतीचा अवलंब करण्याकडे हे पहिलं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे केवळ बजेट नव्हे तर पक्की खतावणी असल्याचं म्हटलं आहे. (अर्थसंकल्पातील लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
ANI Tweet
निर्मला सीतारमण मोदी सरकारमध्ये आधी संरक्षणमंत्री होत्या आणि आता नव्या सरकारमध्ये अर्थमंत्री पद सांभाळत आहेत त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार्या निर्मला सीतारमण या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.