मनोहर पर्रिकर पंचत्त्वात विलीन, मिरामार बीच वर झाले अंतिम संस्कार

'मनोहर भाई अमर रहे'च्या घोषणा देत साश्रू नयनांनी मनोहर पर्रिकर यांना शेवटचा निरोप देण्यात आला.

Manohar Parrikar Last rites (Photo Credits: ANI/Twitter)

लष्करी इतमामामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांच्यावर मिरामार बीच (Miramar beach) परिसरामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. मनोहर पर्रिकरांना लष्कराकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मनोहर पर्रिकर यांचे दोन्ही चिरंजीव  उत्पल आणि अभिजात पर्रिकर  उपस्थित आहेत. त्यांनी काही अंतिम विधी पूर्ण करत मनोहर पर्रिकर यांना शेवटचा निरोप दिला. यावेळेस 'मनोहर भाई अमर रहे'च्या घोषणा देत साश्रू नयनांनी मनोहर पर्रिकर यांना शेवटचा निरोप देण्यात आला. गोव्यात नरेंद्र मोदी(Narendra Modi), भाजपा अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, भाजपा मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन पार्थिवाचं दर्शन घेतलं. मनोहर पर्रिकर यांना निरोप देताना स्मृती इराणी यांना अश्रू अनावर

 ANI ट्विट 

मनोहर पर्रिकर मागील वर्षभरापासून स्वादूपिंडाच्या कॅन्सरला लढा देत होते. गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर पर्रिकर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात केंद्रीय संरक्षण मंत्रीपदी विराजमान झाले. दोन वर्ष काम केल्यानंतर ते गोव्यात पुन्हा परतले. आजारपणामध्येही पर्रिकर कामामध्ये गढलेले असे. परंतू मागील काही दिवसांपासून त्यांची अवस्था अत्यंत खालावली आणि अखेर रविवार (17 मार्च) संध्याकाळी गोव्याच्या राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मनोहर पर्रीकर यांचा बळी घेणारा 'स्वादुपिंडाचा कॅन्सर' World’s Toughest Cancer म्हणून ओळखला जातो, या कॅन्सरमध्ये रुग्ण बचावण्याची शक्यता अत्यल्प का असते?

गोव्यामध्ये मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर आता मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याकडे गोवेकरांचे लक्ष लागले आहे. लवकरच त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif