Festive Season Trains: आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; मध्य रेल्वेकडून 70 लांब पल्ल्याच्या गाड्यांची घोषणा, जाणून घ्या वेळापत्रक
त्याशिवाय मध्य रेल्वेने आणखी दोन विशेष रेल्वे सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी सणासुदीच्या दिवसांसाठी मध्य रेल्वेने (Central Railway) 70 लांब पल्ल्याच्या विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. याद्वारे रेल्वे सणासुदीच्या हंगामासाठी प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्याची तयारी करत आहे. आगामी नवरात्र, दिवाळी आणि छट पूजा इ. सणांमध्ये प्रवाशांच्या मागणीतील अपेक्षित वाढ पूर्ण करण्यासाठी या अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा 15 ऑक्टोबरपासून देशात शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर विशेष-
ट्रेन क्रमांक 01043 ही 19 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 12.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 21.15 वाजता समस्तीपूरला पोहोचेल.
परतीच्या दिशेने गाडी क्रमांक 01044 ही 20 ऑक्टोबर ते 01 डिसेंबर या कालावधीत दर शुक्रवारी रात्री 11.20 वाजता समस्तीपूरहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 07.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
ही गाडी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी जंक्शन, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुझफ्फरपूर येथे थांबेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस साप्ताहिक विशेष-
ट्रेन क्रमांक 01053 लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून 16 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर कालावधीमध्ये दर सोमवारी दुपारी 12.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4.05 वाजता बनारसला पोहोचेल.
परतीच्या दिशेने गाडी क्रमांक 01054 स्पेशल 17 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक मंगळवारी रात्री 8.30 वाजता बनारसहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 11.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
ही गाडी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज छेओकी जंक्शन येथे थांबेल.
मुंबई-मंगळुरु जंक्शन साप्ताहिक विशेष-
ट्रेन क्रमांक 01185 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनसपासून 20 ऑक्टोबर ते 01 डिसेंबर या कालावधीत दर शुक्रवारी रात्री 10.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5.05 वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल.
परतीच्या दिशेने गाडी क्रमांक 01186 स्पेशल ही 21 ऑक्टोबर ते 02 डिसेंबर या कालावधीत दर शनिवारी रात्री 8.45 वाजता मंगळुरु जंक्शनला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2.25 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरथकल आणि ठोकूर येथे थांबेल.
पुणे-अजनी विशेष-
ट्रेन क्रमांक 02141 विशेष गाडी 17 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान दर मंगळवारी दुपारी 3.15 वाजता पुणे जंक्शनवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04.50 वाजता अजनी येथे पोहोचेल.
परतीच्या दिशेने, 02142 स्पेशल ट्रेन 18 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत दर बुधवारी सायंकाळी 7.50 वाजता अजनीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.35 वाजता पुणे जंक्शन येथे पोहोचेल. (हेही वाचा: Bihar Train Accident: रघुनाथपूर स्टेशनवर 48 तासांत दुसरी ट्रेन रुळावरून घसरली, मोठी दुर्घटना टळली)
ही दौंड कोर्ड लाइन, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबेल.
पुणे-गोरखपूर सुपरफास्ट साप्ताहिक-
गाडी क्रमांक 01431 20 ऑक्टोबर ते 01 डिसेंबर या कालावधीत दर शुक्रवारी पुण्याहून 4.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजता गोरखपूरला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01432 स्पेशल गोरखपूर येथून 21 ऑक्टोबर ते 2 डिसेंबर या कालावधीत दर शनिवारी दुपारी 12.25 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 6.25 वाजता पुण्याला पोहोचेल.
ती दौंड चौर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, विरांगना लक्ष्मीबाई जंक्शन, ओराई, कानपूर, लखनौ, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलीलाबाद येथे थांबेल.
ट्रेन क्रमांक 01053 चे बुकिंग 15 ऑक्टोबर रोजी सुरू होईल आणि ट्रेन क्रमांक 01043/01185/02141 आणि 01431 विशेष गाड्यांचे बुकिंग 16 ऑक्टोबर रोजी सुरू होईल. त्याशिवाय मध्य रेल्वेने आणखी दोन विशेष रेल्वे सेवा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन क्रमांक 01127 एलटीटी-बल्हारशाह साप्ताहिक स्पेशलची सेवा 28 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 01128 बलहारशाह साप्ताहिक स्पेशलची सेवा 29 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे