IPL Auction 2025 Live

Farmers Protest: शेतकरी आंदोलन- आज 35 वा दिवस, केंद्र सरकार पुन्हा करणार चर्चा; बैठकीकडे देशाच्या नजरा

तोमर यांनी सोमवारी म्हटल होते की, चर्चेमध्ये अडथळे असलेले मुद्दे दुर होण्याची आशा आहे.

Farmers' protest in Delhi | (Photo Credits: PTI)

राजधानी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) आज 35 वा दिवस आहे. केंद्र सरकारने संमत केलेले कृषी कायदे (Farm Laws) मागे घ्यावेत आणि किमान भाव (MSP) हमी द्यावी यासाठी हे शेतकरी आंदोलन करत आहेत. अद्याप एक महिना झाला तरीही या आंदोलनावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज (बुधवार, 30 डिसेंबर 2020) पुन्हा एकदा शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार (Central Government) यांच्यात बैठक पार पडत आहे. या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

आजच्या बैठकीपूर्वी केंद्री कृषीमंत्री नरेंद्र सिह तोमर (Narendra Singh Tomar) आणि पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी केंद्रीय गृहमंत्री, भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, बुधवारी शेतकऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकेल याबाबत या भेटीत चर्चा करण्यात येईल.

कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, खाद्य एवं उपभोक्ता मंत्री (Food and Consumer Affairs) पीयूष गोयल, अर्थ आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश हे केंद्र सरकारच्या वतीने केंद्र सरकारचे प्रतिनिधीत्व करत आहेत. तोमर यांनी सोमवारी म्हटल होते की, चर्चेमध्ये अडथळे असलेले मुद्दे दुर होण्याची आशा आहे. (हेही वाचा, Punjab: Reliance Jio च्या विरोधात शेतकऱ्यांचा राग; तोडले 1,500 हून अधिक मोबाइल टॉवर्स, जाणून घ्या नक्की काय आहे कारण)

केंद्र सरकारने सोमवारी आंदोलन करत असलेल्या 40 संघटनांना सर्व तत्कालीन मुद्द्यांवर तार्किक दृष्ट्या उत्तर शोधण्यासाठी 30 डिसेंबरला चर्चा करण्यासाठी निमंत्रित केले. परंतू, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधित्व करणार्या संयुक्त किसान मोर्चाने मंगळवारी केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रात म्हटले की, तीन्ही कृषी कायदे रद्द आणि किमान मूल्य हमी कायदा याबाबत हमी देण्याच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा व्हायला हवी. त्यामुळे आता या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.