Eveready आता वॉरन बफे यांच्या Duracell कंपनीच्या मालकीची? 1700 कोटी रुपयांना व्यवहार झाल्याची चर्चा

एवरेडी कंपनीचे वार्षीक उत्पन्न सुमारे 900 कोटी रुपये आहे. शतकांहूनही अधिक काळ बाजारात वास्तव्य करत असलेल्या या कंपनीची मालकी 1905 पासून यूनियन कारबाईड इंडियाकडे होती. ब्रिज मोहन खेतान यांनी बॉम्बे डाइंगच्या नुस्लि वाडिया यांच्यासोबत व्यावसायीक स्पर्धेनंतर 1993 मध्ये ही कंपनी 300 कोटी रुपयांना खरेदी केली होती.

Eveready | (Photo Credits: PixaBay)

बॅटरी उत्पादनात अव्वल असलेली भारतीय कंपनी एवरेडी (Eveready) विकण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. अमेरिकी अब्जाधिश वॉरन बफे याच्या मालकीची असलेली बर्कशायर हैथवे चा घटक असलेली ड्यूरासेल (Duracell) ही कंपनी एवरेडी खेरेदी करत असल्याची चर्चा आहे. इकोनॉमिक्स टाइम्स ने दिलेल्या वृत्तानुसार या व्यवाहाराबद्दल आणखी दोन कंपन्या विचार करत आहेत. Powered By Rubicon Project च्या वृत्तात या प्रकरणाशी संबंधीत लोकांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे की, हा व्यवहार अद्याप पूर्ण झाला नाही. मात्र, या व्यवहाराची बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. लवकरच या व्यवहाहाबाबतची औपचारीक घोषणा केली जाईल.

दरम्यान, Eveready (एवरेडी) कंपनीच्या खरेदीवरुन बर्कशायर हैथवे आणि इनरजाइजर होल्डिंग्स या दोन अमेरिकी कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा होती. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अखेर वॉरेन बफे यांच्या कंपनीने या व्यवहारात बाजी मारली. बफे यांची कंपनी या स्लंप सेलमध्ये सुमारे 1600-1700 कोटी रुपयांमध्ये एवरेडी खरेदी करत आहे.

आयकर कायदा 1961 कलम 2 (42सी) अन्वये असे व्यवहार ज्यात एकमुखी रकमेच्या बदल्यात एकापेक्षा अदिक उपक्रमंचा (उद्योगांचा) मालकी हक्क हस्तांतरीत केला जातो. यात कोणतीही इतर मलमत्ता, देणेकऱ्याचे वेगवेगळे मुल्यांकन केले जात नाही. या प्रकरणाशी संबंधीत लोकांच्या माहितीनुसार या व्यवहारात एवरेडीचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स, डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क आणि एवरेडी ब्रांड समाविष्ट आहेत. या आधी व्यवहारासाठी एवरेडीचे मालक खेतान परिवार आणि अमेरिकी कंपनी ड्यूरासेल यांच्यासोबत एनरजाइजरसोबत चर्चा सुरु होती.

जाणकारांचे म्हणने असे की, या व्यवहारात कंपनीला आपले सर्व कर्ज फेडता येणे शक्य होणार आहे. एवरेडी कंपनीवर सुमारे 700 कोटी रुपयांचे कर्ज आहे. कंपनीवर यूको बँके, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आरबीएल, इंडसइंड बँक यांच्यासह इतरही अनेक संस्थांचे कर्ज आहे. एका अहवालानुसार एवरेडी प्रत्येक वर्षी 1.5 अब्ज बॅटरीज बनवते. याशिवाय 20 लाखांहून अधिक फ्लॅश लाईट उत्पादन करते. (हेही डबघाईला गेलेल्या Jet Airways ला हिंदुजा ग्रुप विकत घेणार असल्याची शक्यता

एवरेडी कंपनीचे वार्षीक उत्पन्न सुमारे 900 कोटी रुपये आहे. शतकांहूनही अधिक काळ बाजारात वास्तव्य करत असलेल्या या कंपनीची मालकी 1905 पासून यूनियन कारबाईड इंडियाकडे होती. ब्रिज मोहन खेतान यांनी बॉम्बे डाइंगच्या नुस्लि वाडिया यांच्यासोबत व्यावसायीक स्पर्धेनंतर 1993 मध्ये ही कंपनी 300 कोटी रुपयांना खरेदी केली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Eveready आता वॉरन बफे यांच्या Duracell कंपनीच्या मालकीची? 1700 कोटी रुपयांना व्यवहार झाल्याची चर्चा

हैदराबाद मध्ये PM Kisan Scheme च्या नावे खोट्या मेसेज वर क्लिक केल्याने तरूणाने गमावले 1.9 लाख

Puja Khedkar Case: पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा; 14 फेब्रुवारी पर्यंत अटक टळली

Meta Apologizes for Mark Zuckerberg’s Statement: भारतातील 2024 च्या निवडणुकीसंदर्भात मार्क झुकरबर्गच्या टिप्पणीबद्दल मेटाने मागितली माफी; म्हटले- 'अनावधानाने झाली चूक'

Drishti 10 Starliner Drone Crashes: नौदलाच्या चाचण्यांदरम्यान अदानी डिफेन्स-मेड दृष्टी 10 स्टारलाइनर ड्रोन कोसळला

Share Now