EPF Balance: पीएफ खात्यातील जमा झालेली रक्कम घरबसल्या तपासून पहायाची असल्यास 'या' स्टेप्स फॉलो करा
कर्मचारी भविष्य निधी संगठन (EPFO) ने आपल्या ग्राहकांना ईपीएफ खात्यामधील आर्थिक वर्ष 2019-20 चे व्याज क्रेडिट करण्यास सुरुवात केली आहे. कोविड19 ची परिस्थिती जरी असली तरीही ईपीएफओ त्यांच्या ग्राहकांना 8.5 टक्के दराने व्याज देत आहे.
EPF Balance: कर्मचारी भविष्य निधी संगठन (EPFO) ने आपल्या ग्राहकांना ईपीएफ खात्यामधील आर्थिक वर्ष 2019-20 चे व्याज क्रेडिट करण्यास सुरुवात केली आहे. कोविड19 ची परिस्थिती जरी असली तरीही ईपीएफओ त्यांच्या ग्राहकांना 8.5 टक्के दराने व्याज देत आहे. यामुळे सहा कोटी ग्राहकांना ईपीएफओचा फायदा होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला पीएफ खात्यामधील किती रक्कम जमा झालीय हे घरबसल्या तपासून पहायची असेल तर काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करु शकता.(7th Pay Commission Latest News: तरुणांसाठी खुशखबर, 'या' राज्यात नव्या भरती मध्ये सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार)
जर तुम्हाला Missed Call, SMS, युनिफायइड मेंबर पोर्टल आणि ईपीएफओ वेबसाइटच्या माध्यमातून माहिती मिळवू शकणार आहात. तर जाणून घ्या अधिक.(Aadhaar PVC Cards: 'आधार पीव्हीसी कार्ड' म्हणजे काय? घर बसल्या 'या' पद्धतीने करू शकता ऑनलाईन ऑर्डर; जाणून घ्या)
1. SMS च्या मदतीने
-तुम्हाला 7738299899 वर SMS पाठवावा लागणार आहे.
-मेसेज बॉक्समध्ये EPFOHO UAN ENG असे टाइप करा.
ही सेवा इंग्रजी, हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलगु, मल्याळम आणि बंगाली भाषेत उपलब्ध आहे. तर मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला काही वेळाने पीएफ खात्यासंदर्भातील जमा रक्कमेबद्दल कळणार आहे.
2. मिस्ड कॉलच्या माध्यमातून
मिस्ड कॉलच्या माध्यमातून पीएफ खात्यातील जमा झालेली रक्कम तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. मिस्ड कॉल दिल्यानंतर काही वेळातच SMS मिळेल त्यात तुम्हाला पीएफ खात्यामधील रक्कमेबद्दल माहिती मिळेल.
3. Umang App च्या मदतीने
तुम्हाला प्ले स्टोर किंवा अॅप स्टोरच्या माध्यमातून Umang App डाऊनलोड करावा लागणार आहे. या अॅपवर सरकारी सेवा उपलब्ध आहेत. यामध्ये EPFO ऑप्शन निवडल्यानंतर Employee Centric Service निवडावे लागणार आहे. आता UAN क्रमांक द्या. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी प्राप्त होईल. तर View Passbook अंतर्गत पीएफ तपासून पाहता येणार आहे.
4. EPFO च्या मेंबर पासबुकच्या बेवसाईटच्या माध्यमातून
जर पीएफ मधील रक्कम तपासून पहायची असल्यास https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login येथे लॉग इन करावे लागणार आहे. तेथे तुम्हाला UAN आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉग इन करुन पासबुक तपासून पाहता येणार आहे.
तर वरील काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही पीएफ खात्यामधील किती रक्कम जमा झाली याबद्दल घरबसल्या माहिती मिळवू शकता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)