EID 2020: जम्मू कश्मिर, केरळ, कर्नाटक मध्ये आज रमजान ईद; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मशिदी बंद असल्याने घरच्या घरीच नमाज अदा!

मुस्लिम बांधवांची प्रार्थनास्थळं असलेली मशिद देखील तिन्ही शहरांमध्ये बंद ठेवण्यात आली आहे. अनेक मुस्लिम बांधवांनी घरच्या घरी रमजानची नमाज अदा केली आहे.

Ramadan Eid 2020| Photo Credits: Twitter/ ANI

रमजान ईद (Ramadan Eid) हा मुस्लिम बांधवांसाठी मोठा आनंदाचा, उत्साहाचा सण आहे. पण यंदा भारतासह जगभरात कोरोना व्हायरसचं संकट (Coronavirus Pandemic) घोंघावत असल्याने यंदा रमजान ईद घरच्या घरी साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. काल कश्मिरच्या खोर्‍यात शव्वाल चंद्रकोरीचं (Shawwal Crescent) दर्शन झाल्याने तेथे आज रमजान ईद साजरी केली जात आहे. तर महाराष्ट्राच्या शेजारील राज्य कर्नाटकामध्येही रमजान ईदचा सोहळा आज रंगणार आहे. केरळमध्येही मुस्लिम बांधव आज (24 मे) रमजान ईद साजरी करत आहे. ईद म्हटली की नवे कपडे, बिर्याणीपासून खीर कुर्मा पर्यंत अनेक चविष्ट पदार्थांची मेजवानी असते. पण यंदा सार्‍यांनीच रमजान ईद घरच्या घरी साजरी करण्याचे आदेश असल्याने आज कश्मिर, केरळ, कर्नाटकामध्ये रस्ते ओस पडले आहेत. मुस्लिम बांधवांची प्रार्थनास्थळं असलेली मशिद देखील तिन्ही शहरांमध्ये बंद ठेवण्यात आली आहे. अनेक मुस्लिम बांधवांनी घरच्या घरी रमजानची नमाज अदा केली आहे. Happy Ramadan Eid 2020 Messages: रमजान ईद मुबारक Wishes, Greetings, SMS, Images, च्या माध्यमातून Facebook, WhatsApp Status वर शुभेच्छा देत द्विगुणित करा 'या' सणाचा आनंद!

दरम्यान भारतामध्ये उद्या म्हणजेच सोमवार 25 मे दिवशी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. काल दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामांनी मुस्लिम बांधवांना लॉकडाऊनचे नियम पाळत आणि कोरोना संकटाचं भान ठेवत यंदा सरकारी नियमावलीचं पालन करून ईद साजरी करावी असं आवाहन केलं आहे. दरम्यान यंदा हस्तांदोलन, गळाभेट टाळा असेदेखील ते म्हणाले आहेत.

केरळ मध्ये घरच्या घरी रमजानची नमाज अदा

कर्नाटकातील ईद दिवशीदेखील मोकळे रस्ते

जम्मू कश्मिरमध्ये मशिदी बंद

रमजान हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना आहे. या महिन्याच्या 30 दिवसामध्ये मुस्लिम बांधव रोजा ठेवतात. अल्लाकडे सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. या पवित्र महिन्याची सांगता रमजान ईदने केली जाते.