ED Uncovers Huge Cash In Ranchi: रांची येथे घबाड, तब्बल 30 कोटी रुपयांची रोखड, 6 यंत्रांद्वारे सलग 12 तास उलटले तरी ईडीकडून मोजणी सुरुच (Watch Video)
Ranchi's Huge Cash Haul: झारखंडची (Jharkhand) राजधानी रांची येथे अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) पथकाद्वारे करण्यात आलेल्या छापेमारी दरम्यान सापडलेल्या रोख रकमेमुळे राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. इडीचे अधिकारी पैसे मोजण्याच्या 6 यंत्रांसह पाठिमागील 12 तासांपासून सलग मोजणी करत आहेत.
Ranchi's Huge Cash Haul: झारखंडची (Jharkhand) राजधानी रांची येथे अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) पथकाद्वारे करण्यात आलेल्या छापेमारी दरम्यान सापडलेल्या रोख रकमेमुळे राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. इडीचे अधिकारी पैसे मोजण्याच्या 6 यंत्रांसह पाठिमागील 12 तासांपासून सलग मोजणी करत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार आणि वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार जवळपास 30 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मोजली गेली आहे. रोखड स्वरुपात असलेल्या पैशांची ही मोजणी अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे ही रक्कम नेमकी किती रुपयांची आहे याबाबत अंतिम आकडा निश्चित करण्यासाठी ईडीचे अधिकारी काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. पैसे मोजत असताना मोजणी यंत्रात बिघाड होत आहे. त्यामुळे काहीसा विराम घेऊन हे काम अव्याहतपणे सुरुच आहे.
वीरेंद्र राम यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापे
झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या घरातील मदतनीस असलेल्या व्यक्तीच्या घरातील खोलीमध्ये ही रक्कम सापडल्याची माहिती आहे. अंमलबजावणी संचालनालय द्वारा झारखंड ग्रामीण विकास विभागाचे माजी मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकून केलेल्या कारवाईदरम्यान रोख रक्कम उघडकीस आली. दरम्यान, वीरेंद्र राम यांना सरकारी योजनांमध्ये कथित अनियमितता असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. (हेही वाचा, Mahua Moitra: महुआ मोईत्रा यांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल- रिपोर्ट)
ED कारवाईवरुन राजकीय वादळ
झारखंडमधील लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी ईडीने केलेल्या कारवाईवरुन राजकीय वादळ निर्माण झाले आहे. भाजपने काँग्रेस मंत्र्यांच्या संगनमतावर ताशेरे ओढले असून विरोधी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ओडिशामध्ये प्रचार करताना, रोख रकमेचा संदर्भ देत, राजकीय विरोधकांकडून संभाव्य टीकेला न जुमानता भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्याची आपली वचनबद्धता प्रतिपादन केली. दरम्यान, या सर्व घटनेवर प्रतिक्रिया देताना, झारखंड भाजपचे प्रमुख बाबूलाल मरांडी यांनी मंत्री आलमगीर आलम यांना पदावरून हटवण्याची मागणी करत मंत्र्यांच्या निवासस्थानातील संभाव्य शोधांच्या मर्यादेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, आलमने त्यांचे वैयक्तिक सचिव संजीव लाल यांच्या व्यावसायिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकून ईडीचा तपास पूर्ण होईपर्यंत अकाली निष्कर्ष न काढण्याचे अवाहन केले आहे. (हेही वाचा, Bird Flu Outbreak in Jharkhand: रांचीमध्ये बर्ड फ्लूचा झपाट्याने प्रसार; 2 डॉक्टर आणि 6 जण क्वारंटाईन)
व्हिडिओ
अलम यांनी आपल्या वतीने खुलासा करताना म्हटले आहे की, ईडीने तपास पूर्ण करण्यापूर्वी कोणीही निष्कर्षापर्यंत पोहोचू नये. संजीव लाल यांनी दोन माजी मंत्र्यांचे सचिव म्हणून काम केले होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. "संजीव लाल हे सरकारी कर्मचारी आहेत. ते माझे वैयक्तिक सचिव आहेत. संजीव लाल हे यापूर्वी दोन माजी मंत्र्यांचे वैयक्तिक सचिव राहिले आहेत. आम्ही सहसा अनुभवाच्या आधारे वैयक्तिक सचिवांची नियुक्ती करतो. ईडीच्या तपासापूर्वी छाप्यांवर भाष्य करणे योग्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)