25 मेपासून सुरु होणार देशांतर्गत उड्डाणे; सर्व विमानतळांना सज्ज राहण्याचा Aviation Ministry चा आदेश
नागरी उड्डयन मंत्री हरदीप पुरी (Civil Aviation Minister Hardeep Singh Pur) यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली
कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या लॉक डाऊन (Lockdown) मध्ये केंद्राने महत्वाचा निर्णय घेत, 25 मेपासून देशांतर्गत उड्डाणे (Domestic Flights) सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. नागरी उड्डयन मंत्री हरदीप पुरी (Civil Aviation Minister Hardeep Singh Pur) यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. लॉकडाऊनमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंदी घातली होती. मात्र अलीकडेच सरकारने पुन्हा रेल्वे सेवा सुरू केली आणि आता देशांतर्गत उड्डाणेदेखील 25 मेपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. हरदीप पुरी म्हणाले की, सर्व विमानतळे आणि विमान कंपन्यांनी 25 मेपासून उड्डाणे सुरू करण्यास आपली तयारी केली पाहिजे. यासाठी प्रवाशांना एसओपी देखील देण्यात येत आहे.
यापूर्वी नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी एका ट्वीटमध्ये म्हटले होते की, हवाई सेवा सुरू करण्याची जबाबदारी केंद्र तसेच राज्यांची आहे. त्यांनाही यासाठी तयार असले पाहिजे. तसेच यापूर्वी जेव्हा हवाई प्रवास सुरू करण्याची चर्चा झाली होती, तेव्हा केंद्राने एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया जारी केली होती. यामध्ये आरोग्य सेतु अॅप हवाई प्रवासासाठी बंधनकारक असणार होते. याशिवाय 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
> केवळ वेब-चेकिनला परवानगी असणर आहे,
> कोणत्याही केबिन सामानास परवानगी दिली जाणार नाही.
> फोनमध्ये आरोग्य सेतु अॅप असणे बंधनकारक असेल.
> प्रत्येकास मास्क आणि हातमोजे यासारखे संरक्षणात्मक पोशाख घालणे आवश्यक आहे.
> प्रत्येकाने 4 फूट अंतर राखणे आवश्यक आहे. (हेही वाचा: क्वारंटाईन सेंटरमध्ये अश्लील नृत्यानंतर आता गांजा पार्टी; व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून तपास सुरु)
> विमानतळ कर्मचार्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे.
> प्रवासी त्यांच्यासोबत 350 मिलीलीटर हँड सेनिटायझर घेऊन जाऊ शकतात.
दरम्यान, 24 मार्च म्हणजेच, लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून देशात विमानंवर बंदी घालण्यात आली आहेत. लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मे पर्यंत असेल, त्यामुळे आता हळूहळू बहुतेक निर्बंध सरकारकडून कमी केले जात आहेत. रेल्वेने मंगळवारी 200 नॉन-एसी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. टाईम टेबलनुसार या गाड्या 1 जूनपासून धावतील.