Delhi: पत्नीच्या प्रियकाराने केली नवऱ्याची हत्या, नाल्यात शव फेकल्यानंतर टॅटूमुळे झाला घटनेचा उलगडा
न्यू फ्रेंड्स कॉलनी ठाण्याच्या पोलीस टीमने तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पत्नी, सासूसह 7 जणांना अटक केली आहे.
Delhi Murder: दिल्लीतील पोलिसांनी एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे. न्यू फ्रेंड्स कॉलनी ठाण्याच्या पोलीस टीमने तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पत्नी, सासूसह 7 जणांना अटक केली आहे. या व्यतिरिक्त हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकू, मृत तरुणाचा मोबाईल फोन, शव ज्या ठिकाणी फेकण्यासाठी वापरण्यात आलेली ऑटो आणि रक्ताचे डाग असलेले आरोपींचे कपडे ताब्यात घेतले आहेत.(Bhopal: पोटच्या मुलांचा गळा चिरून आई-वडिलांनी केले विष प्राशन, पोलीस चौकशीतून धक्कादायक माहिती उघड)
पोलिसांना 10 ऑगस्ट रोजी न्यू फेंड्स कॉलनीतील सुखदेव विहार जवळील नाल्यात पडलेल्या सूटकेस मध्ये शव असल्याची माहिती मिळाली. काळ्या रंगाच्या ट्रॉली बॅगेत विचित्र पद्धतीने ते शव त्यात आढळून आले. तर चेहरा सडल्याने तेव्हा व्यक्तीची ओळख पटली नाही. मात्र मृत व्यक्तीच्या डाव्या हातावर नवीन नावाचा एक टॅटू असल्याचे दिसून आले. त्याचसोबत त्याने हातात एक स्टिलचे कडे सुद्धा घातले होते.
या प्रकरणी अधिक तपास केला असता पोलिसांनी नवीन नावाचा व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार मुस्कान नावाच्या महिलेने केल्याचे कळले. बेपत्ता असलेल्या तक्रारीवरुन पोलिसांना कळले की मृत व्यक्ती हा नवीन आहे. परंतु तेव्हा सुद्धा काहीसे स्पष्ट झाले नव्हते. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या घरी धाव घेतली. तेव्हा असे कळले की, काही दिवसांपूर्वीच ती घर खाली करुन तेथून निघून गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी घराच्या मालकाला विचारले असता त्याने म्हटले की, मुस्कान हिने काही कारण न सांगता घर खाली केले आणि अचानक निघून गेली.
शेजाऱ्यांनी असे सांगितले की, मुस्कान ही आपली आई आणि दोन वर्षाची मुलगी हिच्यासोबत राहत होती. येथे एक मुलगा सुद्धा येत होता. मात्र त्याचे काही नाव किंवा त्याबद्दल अधिक माहिती नव्हते. तपासात असे समोर आले की, भाड्याच्या घरातून निघण्यापूर्वीच्या आधी रात्रीच्या वेळेस घरात मारहाण सुरु होती. पोलिसांनी मुस्कान हिचा मोबाईल क्रमांक मिळवला.
मुस्कान हिचे लोकेशन ट्रेस करत पोलीस खानपुरात दाखल झाले. येथे मुस्कान आपली आई आणि मुलगी सोबत राहत होती. त्यानंतर पोलिसांनी मुस्कान हिला तिच्या पतीच्या हातावरील नवीन नावाच्या टॅटूबद्दल विचारले असता सुरुवातीला तिने त्यासाठी नकार दिला. मात्र तिच्या फोनमध्ये नवीन याचचा फोटो पाहिला असता तेव्हा त्याच्या डाव्या हातावर टॅटू असल्याचे दिसून आले. त्यानंतरच मृत व्यक्ती हा नवीन असल्याची पुष्टी झाली.(Karnataka Horror: अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून बलात्कार, 4 आरोपींना अटक)
पोलिसांनी अधिक तपास केला असता असे कळले की, मुस्कान हिचे नवीन सोबत 4-5 वर्षांपासून अफेअर होते आणि यांना एक मुलगी सुद्धा आहे. मात्र गेल्या 7 महिन्यांपासून ते दोघे वेगळे राहत होते. मुस्कान हिने पोलिसांना पुढे असे सांगितले की, 7 ऑगस्ट रोजी ती तिचा मित्र जमाल याच्यासोबत घरात होती. तेव्हाच नवीन आला. जमाल याला पाहून नवीन संतप्त झाला आणि त्याने मारहाण केली. यानंतर जमाल याचे दोन मित्र सुद्धा घरी आले. हे झाल्यानंतर जमाल याने कौळलेंद्र आणि विवेक याच्यासोबत मिळून नवीन याची हत्या केली.
हत्येनंतर शव नवीन याने वॉशरुममध्ये धुतले, तसेच रक्ताचे डाग सुद्धा पुसून काढले. जमालने सकाळी आपला मित्र राजपाल याला सुद्धा बोलावले. या सर्वांनी मिळून शव एका ट्रॉली बॅगेत भरुन नाल्यात फेकले. त्याचसोबत रक्ताचे डाग असलेले कपडे सुद्धा नाल्यात फेकून दिले.