दिल्लीत Remdesivir इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना अटक

कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमिडेसिव्हर इंजेक्शनचा (Remdesivir Injection) काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना दिल्लीतील टिळक नगर परिसरातून अटक करण्यात आली आहे.

Remdesivir (PC - ANI)

कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमिडेसिव्हर इंजेक्शनचा (Remdesivir Injection) काळाबाजार करणाऱ्या दोन जणांना दिल्लीतील टिळक नगर परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून इंजेक्शनच्या दोन बॉटल्स जप्त करण्यात आल्याची माहिती दिली गेली आहे. गुरप्रीत सिंग आणि अनुज जैयस्वाल अशी दोघांची नावे आहेत. सिंग याचा मायापुरी येथे सुटे पार्ट्सचा उद्योग आहे. त अनुज जैयस्वाल हा कृष्णा नगर येथील एका रुग्णालयात काम करतो. तर 25 एप्रिलला पोलिसांना दोनजण इंजेक्शनच्या डिलिव्हरीसाठी येणार असल्याचे कळले. त्यानुसार पोलिसांनी कट रचून त्यांना अटक केली. सिंह याने पोलिसांना सांगितले की, रेमिडेसिव्हर इंजेक्शनची सर्वाधिक मागणी पाहता त्याचा काळाबाजार करत होता.(COVID 19 In India: शाकाहारी, धुम्रपान करणारे आणि O रक्तगटातील मंडळींमध्ये सेरो पॉझिटीव्हिटी तुलनेत कमी; CSIR survey चा अहवाल)

नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्व डीसीपी आणि गुन्हे शाखेच्या युनिटला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा सुचना दिल्या आहेत की, औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी. त्याचसोबत त्यांचा काळाबाजार होणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यावी. पोलिसांनी पुढे असे ही म्हटले की, रेमिडेसिव्हर आणि टोकलिझुमब औषधांचा सध्या तुटवडा भासत आहे. त्यामुळे काही केमिस्टकडून त्याचे वाढीव दर लावून ते विक्री केले जात आहे. त्यामुळे त्यांच्या गुप्त लोकांकडून काळाबाजार करणाऱ्यांसंबंधित माहिती एकत्रित करत असून त्यांच्या विरोधात कारवाई करत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Delhi Lockdown: दिल्लीमध्ये लॉकडाऊनचा कालावधी एका आठवड्यासाठी वाढविण्यात आला; 3 मेंपर्यंत लागू राहणार कडक निर्बंध)

दरम्यान दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा तुफान वाढला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागातील काही गोष्टी सुद्धा समोर येत आहेत. दिल्लीत सध्या रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजनची खुप कमतरता भासत आहे. परंतु केंद्र सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून दिल्लीला  ऑक्सिजनचा पुरवठा करत आहे. सोमवारी रात्री पर्यंत पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस दिल्ली पोहचणार आहे. त्यामध्ये 70 टन ऑक्सिजन असणार आहे. त्याचसोबत दिल्लीत लॉकडाऊन सुद्धा एका आठवड्यांनी वाढवला आहे.