दिल्ली: ISRO चा वैज्ञानिक म्हणून असल्याचे भासवून लग्न करणाऱ्या नवऱ्याची बायकोकडून सत्याची पोलखोल
मात्र या प्रकारावर आता त्याची बायकोनेच सत्याची पोलखोल केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
राजधानी दिल्ली (Delhi) येथे एका व्यक्तीने आपण इस्रोचे (ISRO) वैज्ञानिक असे सांगून लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र या प्रकारावर आता त्याची बायकोनेच सत्याची पोलखोल केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.तर आरोपीने स्वत: आपण इस्रोचा वैज्ञानिक असल्याचे सांगून पीएचडी पूर्ण केलेल्या एका तरुणीसोबत लग्न केले. तसेच वैज्ञानिक असल्याची खरी ओळख पटावी म्हणून आरोपीने आयडी कार्डसह अन्य महत्वाची कागदपत्रे सुद्धा दाखवली. यामुळे बायकोच्या घरातील मंडळींना आरोपी वैज्ञानिक असल्याचे वाटले.
या दोघांचा विवाहसुद्धा झाल्यानंतर त्याने बायकोला डिफेंस रिसर्च डेव्हलपमेंट येथे काम केले असल्याचे सांगितले. तसेच अंतराळ अभ्यासासाठी आता अमेरिकेतील नासा येथे जात असल्याचे ही सांगितले. मात्र बायकोला नवऱ्याच्या या गोष्टींवर विश्वास बसेनासा झाला तेव्हा तिने एका अॅपच्या माध्यमातून त्याच्या ठिकाणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र अॅपच्या माध्यमातून नवरा अमेरिका नव्हे तर गुडगाव येथे असल्याचे ठिकाण दिसून आले.(धक्कादायक! जादूटोण्याच्या संशयावरून खाऊ घातली मानवी विष्टा, उपटून काढले दात; 29 जणांना अटक)
यावरुन बायकोच्या घरातील मंडळींना त्याचा शोध काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर नवऱ्याच्या खोटारडेपणाचा खुलासा झाला. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसात धाव घेत आरोपी नवऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच नवऱ्याने आजवर काय आणि किती गोष्टींबाबत आपली फसवणूक केली असल्याचे ही महिलेने पोलिसांना सांगितले. एवढेच नाही तर नवऱ्याचे यापूर्वी सुद्धा लग्न झाल्याचे ही पोलिसांना स्पष्टीकरण देण्यात आले आहे.