संमतीने Sex केल्यावर प्रेयसीला धोका देणे हा गुन्हा नाही: उच्च न्यायालय
या प्रकरणात आरोपी व्यक्तीने संबंधित महिलेला विवाह करण्याचे कबूल केले होते. मात्र पुढे त्याने आपला विचार बदलला. न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांनी आरोपीवर ठेवलेले आरोप फेटाळून लावत आरोपीला दोषमुक्त ठरवण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) म्हटले आहे की प्रेमसंबंधांमध्ये शारीरसंबंध (Sex) ठेवल्यानंतर प्रियकराने धोका देणे ही कितीही वाईट वाटणारी गोष्ट असली तरी, तो गुन्हा मुळीच नाही. न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, संमतीने शरीरसंबं ठेवण्याबाबत 'नाहीचा अर्थ नाही' इथून पुढे 'होयचा अर्थ होय' इथपर्यंत स्वीकारार्ह आहे. लैंगिक दुष्कृत्य केल्याच्या प्रकरणात एका व्यक्तीची मुक्तता करताना न्यायालायाने हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपी व्यक्तीने संबंधित महिलेला विवाह करण्याचे कबूल केले होते. मात्र पुढे त्याने आपला विचार बदलला. न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांनी आरोपीवर ठेवलेले आरोप फेटाळून लावत आरोपीला दोषमुक्त ठरवण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
या वेळी न्यायालयाने सांगितले की, 'प्रेयसीसोबत धोका होणे हे काही लोकांसाठी वेदनादाई असू शकते. मात्र, भारतीय दंड संहिता अन्वये ही बाब गुन्हा नाही. दोन प्रौढ व्यक्ती एकमेकांच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवत असतील तर, तो कायद्याने गुन्हा नाही.' उच्च न्यायालयाने पुढे सांगितले की, महिलेने लग्नाचे अमिष दाखवून शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप केवळ पूर्वीचे आरोप सिद्ध करण्यासाठीच नव्हे तर, आपले वर्तन योग्य असल्याच्या पुष्ठीसाठीही केला आहे. तिने अंतर्मनातला विचारही स्वीकारला नाही.
या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीश विभु भाखरु यांनी म्हटले आहे की, 'जिथे संमतीने शरीसंबंध ठेवण्याचा प्रश्न आहे, तो 1990 च्या दशकात सुरु झालेले अभियान 'नाहीचा अर्थ नाही' या जागतीक नियमाला अनुसरुन आहे. यात 'न'चा अर्थ आहे की, जोडीदाराकडून शरीसंबंधांना कोणतीही संमती नाही. ' न्यायाधीशांनी पुढे सांगितले की, 'लैंगिक संबंधांबाबत सहमतीवर 'नाहीचा अर्थ नाही' इथून पुढे जाऊन आता 'होयचा अर्थ होय' इथपर्यंत व्यापकतेने स्वीकारला गेला आहे'. त्यामुळे शरीरसंबंधांसाठी जोपर्यंत सकारात्मक दृष्टीकोण, स्वेच्छेने संमती आणि प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत तो गुन्हा ठरु शकेल. परंतू, सकारात्मक दृष्टीकोण, स्वेच्छेने संमती आणि प्रतिसाद असताना ठेवलेले शरीसंबंध मुळीच गुन्हा ठरणार नाहीत. (हेही वाचा, प्रेयसीचा अबोला; प्रियकराकडून तिच्या नाकाचा कडकडून चावा)
या प्रकरणात महिलेने आरोपीने लग्नाचे आमीष दाखवून शरीरसंबंध ठेवले असा दावा केला होता. यावर न्यायालायने म्हटले की, जेव्हा पहिल्यांदा शरीरसंबंधांचे दृष्कृत्य घडले. त्यानंतर पुढे 2016 मध्ये तीन महिन्यांनंतर पक्षकार महिला आरोपीसोबत हॉटेलमध्ये गेलेली व तेथे त्यांनी शरीरसंबंध ठेवलेले स्पष्ट सिद्ध होते. याचा अर्थ या शरीरसंबंधांना तिची संमती होती. त्यामुळे विवाहाचे आमीष दाखवून शरीरसंबंध ठेवले या दाव्यात काहीच तथ्य वाटत नाही.