संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांची एकूण संपत्ती किती? माहित आहे?

राज्यसभा सदस्य, (संपत्ती आणि उत्पन माहिती) नियम 2004 च्या कलम 3 अन्वये प्रत्येक राज्यसभा सदस्याला शपथ गेतल्यानंतर 90 दिवसांच्या आत स्वत:ची आणि जोडीदाराची (पती, पत्नी) तसेच आपल्या अपत्य आणि जवळच्या नातेवाईकांच्या सप्पत्तीचा तपशील सभागृह सभापतींना देणे बंधनकारक असते.

Nirmala Sitharaman | (Photo courtesy: ANI)

संरक्षणमंत्री (Defense Minister) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्यासह राज्यसभेतील 32 खासदारांनी आपल्या संपत्तीबद्दल (Property Details) मौन बाळगले आहे. राज्यसभेच्या नियमानुसार सभागृहात सदस्य म्हणून शपथ घेतल्यावर 90 दिवसांच्या आत आपल्या संपत्तीचा तपशील सभागृह सभापतींना देणे बंधनकारक असते. मात्र, स्वत: संरक्षणमंत्र्यांनीही हे बंधन पाळले नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. त्यामळे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांची एकूण संपत्ती किती? याबात उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार विद्यमान 244 खासदारांपैकी आतापर्यंत 212 खासदारांनी आपल्या संपत्तीचे तपशील सादर केले आहेत. दरम्यान, सपत्ती सादर न करणाऱ्या खासदारांमध्ये भाजपचे 12 आणि काँग्रेसच्या 4 खासदारांचा समावेश आहे. काशीपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नदीम उद्दीन यांनी राज्यसभा सचिवालयातील माहिती अधिकाऱ्यांकडे राज्यसभा कायदा आणि नियमांनुसार खासदारांच्या संपत्तीचा तपशील मागवला होता.

माहिती अधिकाराखाली मावगलेल्या माहितीत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, खासदारांनी 19 डिसेंबर 2018 ते 5 नोव्हेंबर 2018 पर्यंत आपल्या संपत्तीचा तपशील दिला आहे. संपत्तीचा तपशील देणाऱ्या खादारांची एक यादीच तयार करण्यात आली आहे. यात नूतन 32 खासदारांच्या नावांचा समावेश नाही. नदीम यांच्याकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 32 राज्यसभा खासदारांनाही आपल्या संपत्तीचा तपशील 5 नोव्हेंबर 2018 पर्यंत सादर केला नाही. संपत्तीचा तपशील न देणाऱ्या खासदरांमध्ये सर्वाधिक 12 खासदार भाजपचे आहेत. 4 काँग्रेस, 3 एआयटीएस, राजद आणि जेडीयू यांचे प्रत्येकी दोन, बीजद, आणि एआयडीएमके , एसडीएफ आणि एस,एसके पक्षाच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे. (हेही वाचा, कोटींच्या संपत्तीचा त्याग करुन बहिण-भाऊ करणार संन्यासवारी)

संपत्तीचा तपशील जाहीर न केलेले राज्यसभा खासदार

बिहार

मीसा भारती, प्रो. मनोज कुमार झा, डॉ. महेंद्र प्रसाद, अखिलेश प्रसाद सिंह, वशिष्ठ नारायण सिंह

पश्चिम बंगाल

अबीर रंजन विश्वास, मो. नदीम उल हक, डोला सेन

गुजरात

मधुसूदन मिस्त्री, महंत शंभू प्रसाद टुडिया

उडीसा

प्रताप केसरी देव, सौम्या आर पटनायक

उत्तर प्रदेश

डॉ. अनिल अग्रवाल उर्फ सकलदीप राजभर

झारखंड

धीरज प्रसाद साहू

कर्नाटक

निर्मला सीता रमन

मध्यप्रदेश

राजमणि पटेल

महाराष्ट्र

अनिल देसाई

सिक्किम

लंचुगपा

तामिळनाडु

ए. विजय कुमार

राष्ट्रपती नियुक्त खासदार ज्यांनी संपत्तीचा तपशील जाहीर केला नाही

संभाजी छत्रपति, स्वयं दास गुप्ता, रूपा गांगुली, डॉ. नरेंद्र जाघव, एमसी मेरीकॉम, डॉ. सोनल मानसिंह, डॉ. रघुनाथ महापात्र, राम शकल, राकेश सिन्हा, सुरेश गोपी, डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी, केटीएस तुलसी

नदीम यांनी सांगितले की, राज्यसभा सदस्य, (संपत्ती आणि उत्पन माहिती) नियम 2004 च्या कलम 3 अन्वये प्रत्येक राज्यसभा सदस्याला शपथ गेतल्यानंतर 90 दिवसांच्या आत स्वत:ची आणि जोडीदाराची (पती, पत्नी) तसेच आपल्या अपत्य आणि जवळच्या नातेवाईकांच्या सप्पत्तीचा तपशील सभागृह सभापतींना देणे बंधनकारक असते.