CRPF Recruitment 2021: मेडिकल पदासाठी मेगा नोकरभरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

केंद्रीय पोलीस दल (CRPF) मध्ये पॅरा मेडिकल स्टाफ आणि जनरल ड्युटी ऑफिसर (GDMO) च्या पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे.

Representational Image (Photo Credits: File Photo)

CRPF Recruitment 2021: केंद्रीय पोलीस दल (CRPF) मध्ये पॅरा मेडिकल स्टाफ आणि जनरल ड्युटी ऑफिसर (GDMO) च्या पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील एक नोटीस सुद्धा जाहीर केली आहे. त्यानुसार पुणे, हैदराबादसह अन्य विविध ठिकाणी वॉक-इन-इंटरव्यूच्या आधारावर नियुक्ती केली जाणार आहे. ज्यामध्ये जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदांसाठी 13 मे रोजी विविध केंद्रावर इंटरव्यूचे आयोजन केले जाणार आहे.(Maharashtra Health Department Recruitment 2021: महाराष्ट्र आरोग्य विभागात मेगाभरती, 16 हजार पदे भरली जाणार; पाहा सविस्तर)

अधिकृत नोटिफिकेशनच्या नुसार, सीआरपीएफ युनिट्स, जीसी, सीएचएस, संस्थेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकरीसाठी उमेदवार अर्ज करु शकतात. परंतु त्यांनी मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी किंवा संस्थेतून MBBS ची पदवी घेतलेली असावी. तसेच उमेदवाराचे वय अधिकाधिक 65-70 वर्ष असावी. सीआरपीएफमध्ये DGMO च्या पदांवर नोकरीसाठी उमेदवाराची निवड झाल्यास त्याला 75 हजार रुपये प्रति महिना सॅलरी दिली जाणार आहे.(Central Railway Recruitment 2021: सेंट्रेल रेल्वेत सीनियर रेजिडेंटच्या पदासाठी नोकर भरती, 'या' पद्धतीने होईल उमेदवाराची निवड)

सीआरपीएफ जीडीएमओ पदासाठी योग्य उमेदवाराने 13 मे रोजी वॉक-इन-इंटरव्यू मध्ये सहभागी व्हावे. झोन प्रमाणे इंटरव्यूचा पत्ता आणि वेळेच्या माहितीसाठी https://crpf.gov.in/recruitment.htm या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच उमेदवारांनी इंटरव्यूसाठी येताना आपली अत्यावश्यक कागदपत्र सोबत घेऊन यावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.  तसेच उमेदवाराने मूळ कागदपत्रांसह आपला CV, 5 पासपोर्ट साइज फोटो, सर्व कागदपत्रांची झेरॉक्स घेऊन जावी. तर उमेदवारांना वॉक-इन-इंटरव्यू साठी कोणताही टीए-डीए सीआरपीएफ द्वारे केला जाणार नाही आहे. मुख्य बाब म्हणजे नोटिफिकेशन प्रमथ नीट वाचल्यानंतरच अर्ज किंवा इंटरव्यूसाठी तयार रहा.